घरदेश-विदेशस्थलांतरित कामगारांसाठी सरकारची नवीन योजना

स्थलांतरित कामगारांसाठी सरकारची नवीन योजना

Subscribe

या योजनेंतर्गत ५० हजार कोटी रुपये खर्चून २५ प्रकारची कामे कामगारांना देण्यात येणार आहेत.

कोरोना संकटाच्या वेळी मोठ्या संख्येने परप्रांतीय कामगार मुळ गावी परतले. यामुळे कामगारांसमोर रोजगाराचं संकट निर्माण झालं आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकार विशेष मोहीम सुरू करणार आहे. या योजनेचे नाव गरीब कल्याण रोजगार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २० जून रोजी या योजनेला प्रारंभ करणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी माध्यमांना या योजनेची माहिती दिली.

या योजनेंतर्गत देशातील विविध भागांमधून आपापल्या गावी स्थलांतर करणार्‍या परप्रांतीय कामगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासह देशातील सहा राज्यांतील ११६ जिल्ह्यांमध्ये मोहीम सुरू केली जाईल. २० जूनपासून मोहीम सुरू करण्याच्या निमित्ताने या राज्यांचे मुख्यमंत्री आणि संबंध मंत्रालयातील मंत्रीदेखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडले जाणार आहेत.

- Advertisement -

या योजनेंतर्गत ५० हजार कोटी रुपये खर्चून २५ प्रकारची कामे कामगारांना देण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ ज्या राज्यांना होणार आहे त्यात बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड आणि ओडिशाचा समावेश आहे. याचा फायदा २५ हजार स्थलांरित कामगारांना मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, गरीब कल्याण रोजगार अभियानांतर्गत भारत सरकारच्या २५ योजनांचे उद्दिष्टे १२५ दिवसांत ११६ जिल्ह्यात पूर्ण करणार. यात स्थलांतरित मजूर आणि ग्रामीण नागरिकांना काम देण्यात येणार आहे. तत्पूर्वी, गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासगी क्षेत्रासाठी ४१ कोळसा खाणींच्या लिलाव प्रक्रियेची सुरुवात केली.


हेही वाचा – उद्योग जगताला इतिहास बदलण्याची संधी, देशाला आत्मनिर्भर बनवा – पंतप्रधान मोदी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -