घरताज्या घडामोडीमोबाईल लॅबमुळे आता खेड्या-पाड्यात होणार कोरोना चाचणी!

मोबाईल लॅबमुळे आता खेड्या-पाड्यात होणार कोरोना चाचणी!

Subscribe

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोना चाचणीचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी एक मोबाईल लॅब लाँच केली. याचा वापर कोरोना चाचणीकरिता केला जाणार आहे. या लॅबच्या मदतीने खेड्या-पाड्यातील भागात जाऊन चाचणी केली जाईल. अशा प्रकारची देशातील ही पहिली लॅब आहे.

- Advertisement -

 

मिळालेल्या माहितीनुसार, या मोबाईल लॅबमध्ये रोज कोरोना विषाणूच्या २५ आरटी-पीसीआर चाचण्या, ३०० टेस्ट ELISA चाचण्या केल्या जाऊ शकतात. शिवाय टीबी आणि HIV संबंधित काही चाचण्या देखील केल्या जाऊ शकतात. आधुनिक सुविसांहसह मोबाईल लॅबला विकसित केले गेले आहे.

- Advertisement -

सरकारच्या म्हणण्यानुसार, जिथे लॅबची सुविधा नाही आहे. तिथे या लॅबचा वापर केला जाईल. म्हणजे छोट्या गाव-खेड्यांमध्ये याचा वापर केला जाऊ शकतो.

यादरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले की, फेब्रुवारीमध्ये फक्त एकच लॅब होती. पण आता आपल्याकडे ९५३ लॅब आहेत. यामध्ये ७०० लॅब सरकारी आहे. त्यामुळे आता देशात कोरोना विषाणू चाचणी जास्त होतील.

या मोबाईल लॅबबद्दल केंद्रीय मंत्री म्हणाले की, दूर असलेल्या भागात या लॅब वापर केला जाईल. आतापर्यंत देशात कोरोना विषाणूच्या सुमारे ६३ लाख चाचण्या केल्या आहेत. मागील २४ तासांत देशात जवळपास पावणे दोन लाख चाचण्या झाल्या आहेत.


हेही वाचा – आरोग्य सेतू App अवघ्या ४५ दिवसांत १३ कोटी भारतीयांनी केला डाऊनलोड!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -