घरदेश-विदेश...तर दिल्लीतून पळ काढायला मार्ग सापडणार नाही; सिद्धूची शेतकरी नेत्यांना धमकी

…तर दिल्लीतून पळ काढायला मार्ग सापडणार नाही; सिद्धूची शेतकरी नेत्यांना धमकी

Subscribe

प्रजासत्ताक दिनी काढण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं. प्रजासत्ताक दिनी उफाळून आलेल्या हिंसाचारात प्रामुख्याने चर्चा होती लाल किल्ल्यावर फडकवलेल्या खालसा पंथाच्या ध्वजाची. दरम्यान, लाल किल्ल्यावर खालसा पंथाचा झेंडा लावण्यासाठी भडकवल्याचा आरोप असलेल्या पंजाबी गायक दीप सिद्धू याने स्वत: निर्दोष असल्याचं सांगितलं आहे. बुधवारी रात्री उशिरा फेसबुकवर लाईव्ह येत त्याने त्याच्यावर होत असलेले आरोप फेटाळून लावले आहेत. यावेळी शेतकरी नेत्यांना धमकी देखील त्याने दिली आहे. तुम्ही मला विश्वासघात केल्याचं प्रमाणपत्र दिलं आहात. जर मी तोंड उघडलं तर तुम्हाला दिल्लीतून पळ काढण्यासाठी कोणताही मार्ग सापडणार नाही, अशी धमकी दीप सिद्धूने दिली आहे.

सिद्धू म्हणाला, मला लाईव्ह यावं लागलं कारण माझ्याविरोधात द्वेष पसरविला जात आहे. बरंच खोटं पसरवलं जात आहे. मी बरेच दिवस शांत होतो, कारण आमच्या आंदोलनाला गालबोट लागू नये, अशी माझी इच्छा होती, परंतु आपण ज्या टप्प्यावर आलात त्या ठिकाणी काही गोष्टींबद्दल बोलणं फार आवश्यक झालं आहे. पहिली गोष्ट म्हणजे २५ जानेवारीच्या रात्री, व्यासपीठावर तरुणांनी आपला संताप व्यक्त केला होता, कारण त्यांना पंजाबहून दिल्ली येथे परेडसाठी बोलावण्यात आले होते. त्यासाठी व्यासपीठावरून वारंवार मोठ्या घोषणा व आश्वासने देण्यात आली. संतापलेल्या या तरुणांनी सांगितलं की, आता आम्ही दिल्लीला आलो आहोत, तेव्हा तुम्ही आम्हाला सरकारने मान्य केलेल्या मार्गावर जाण्यास सांगत आहात, जे आम्हाला मान्य नाही, असं दीप सिद्धूने फेसबुक लाईव्हमध्ये सांगितलं.

- Advertisement -

सिद्धूने त्याच्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की त्यावेळी रंगमंचावरील परिस्थिती अशी बनली होती की नेतृत्व करणारे शेतकरी नेते तेथून निघून गेले. त्यानंतर निहंगचे गटाने परिस्थिती खराब झाल्याचं सांगत मला बोलावलं. मी तेथे गेलो आणि शेतकरी नेत्यांचं समर्थन केलं. आंदोलकांना समजावलं की शेतकरी नेते वृद्ध आहेत. ते खूप अस्वस्थ आहेत, म्हणून आम्हाला समजून घेतलं पाहिजे, असं दीप सिद्धू म्हणाला.

मी त्या दिवशी देखील असंच बोललो होतो. मी शेतकरी नेत्यांना देखील सांगितलं होतं की लोक जे म्हणतात त्यानुसार सामूहिक निर्णय घ्या, तो निर्णय चुकीचा होणार नाही, कारण आपलं आंदोलन एकीमुळे सुरु आहे. हे शेतकरी नेत्यांना समजलं नाही. दुसर्‍या दिवशी पोलिसांनी सांगितलेल्या मार्गावर मोर्चा काढला. सिंघू-टिकरी आणि गाझीपूर सीमेवरचे लोक स्वतःच चुकीच्या मार्गावरुन लाल किल्ल्याकडे निघाले. कोणीही त्यांचं नेतृत्व करीत नव्हतं.

- Advertisement -

लाल किल्ल्याचा दरवाजा मी येण्यापूर्वीच तुटलेला

दीप सिद्धू म्हणाला, मी लाल किल्ल्यावर पोहोचलो तेव्हा गेट तुटला होता. हजारो लोकांची गर्दी त्यावर उभी होती. मी नंतर तिथे पोहचलो. ज्या रस्त्याने मी आलो त्या ठिकाणी शेकडो ट्रॅक्टर आधीच पोहचले होते. तिथे कोणताही शेतकरी नेता दिसला नाही.


हेही वाचा –  शेतकरी आंदोलनामध्ये मोठी फूट; दोन शेतकरी गटांची आंदोलनातून माघार


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -