घरदेश-विदेशअयोध्या मशीद बांधणीला वर्गणी म्हणजे 'हराम' - ओवेसी

अयोध्या मशीद बांधणीला वर्गणी म्हणजे ‘हराम’ – ओवेसी

Subscribe

अयोध्यात उभी राहणारी मस्जिदीच्या पायाभरणीचे काम प्रजासत्ताक दिनी म्हणजे २६ जानेवारीला सुरू झाले. पण अशातच एमआयएम (AIMIM)चे असदुद्दीन ओवेसी यांच्या वक्तव्याने आणखी एक वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ओवेसी यांच्या वक्तव्यावर आता प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. ओवेसी आपला राजकीय अजेंडा राबविण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्ये करत आहेत असा आरोप त्यांच्यावर होऊ लागला आहे. ओवेसी यांनी अयोध्येत मस्जिद उभारण्यासाठी वर्गणी देण्याच्या कृत्याला त्यांनी हराम असे संबोधले होते. तसेच याठिकाणी नमाज अदा करणे म्हणजेही हराम आहे असे ते म्हणाले. ओवेसींच्या या वक्तव्यावरच इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनचे सचिव अथर हुसैन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केवळ राजकारण करण्यासाठी ओवेसींकडून अशी वक्तव्ये होत असल्याचे त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. ओवेसी यांनी बिदर येथे झालेल्या एका कार्यक्रमात वक्तव्य केले होते की, अयोध्या मशीद उभारणीला वर्गणी देणे हे धर्मविरोधी असे काम आहे. त्यासाठीच मुस्लिम धर्मियांनी अशा प्रकारची कोणतीही वर्गणी देऊ नये असे ओवेसी यांनी आवाहन केले होते.

इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनचे सचिव अथर हुसैन यांनी स्पष्ट केले की, जमीनीवरील कोणतीही अशी गोष्ट हराम नाही, जिथे अल्लाहसाठीची नमाझ (प्रार्थना) केली जाते. त्यामुळे ओवेसी यांनी केलेले वक्तव्य त्यांनी खोडून काढले. स्वातंत्र्यासाठीचा जो पहिला उठाव १८५७ मध्ये झाला त्यामध्ये ओवेसी यांचे पूर्वज नसावेत असा दावा हुसैन यांनी केला. ओवेसी हे अशा भागातून येतात ज्या भागाने कधीच या स्वातंत्र्याच्या उठावातील संघर्ष किंवा परिणाम सहन केलेले नाहीत.

- Advertisement -

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या धर्माचे अभ्यासक आणि धर्मरक्षक यांच्याशी चर्चा केल्यानंतरच ओवेसी म्हणाले की त्या जागेला मस्जिद म्हणून नये आणि त्याठिकाणी नमाज अदा करू नये असल्याची चर्चा झाल्याचे ओवेसी यांनी सांगितले. यावर उत्तर देताना हुसैन म्हणाले की, आमचे चॅरिटेबल हॉस्पिटल हे अनेकांना उपचार देतात तर अनेकांचा मोफत इलाज करतात. त्यामुळेच ही गोष्ट हराम नसावी. तसेच कम्युनिटी किचनच्या माध्यमातून दररोज २ हजार लोकांची पोटाची भूक मिटवण्यात येते. अयोध्येत मस्जिद निर्मितीसाठीची प्रक्रिया ही प्रजासत्ताक दिनीच सुरू झाली आहे. धन्नीपुर गावात ही मशीद बांधण्यात येणार आहे. याआधीच्या बाबरी मशीदीपेक्षा मोठी अशी ही नवीन मशीद असणार आहे.

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -