घरट्रेंडिंगबोचऱ्या थंडीत विद्यार्थ्यांकडून करुन घेतले व्यायाम

बोचऱ्या थंडीत विद्यार्थ्यांकडून करुन घेतले व्यायाम

Subscribe

बातमी छापल्याने तीन पत्रकारांवर गुन्हा दाखल

उत्तर प्रदेश स्थापना दिवसानिमित्त आयोजित शासकिय कार्यक्रमात कडाक्याच्या थंडीत लहान विद्यार्थ्यांना हाफ पँन्ट, शर्ट घालून व्यायाम करण्यास सांगिलते होचे. या बोचऱ्या थंडीत विद्यार्थी हाफ गणवेशामध्ये अक्षरश: थंडीने कापत होते. परंतु यासंदर्भातील बातमी प्रकाशित करणाऱ्या तीन पत्रकारांवर उत्तर प्रदेश कानुपरमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या तिन्ही पत्रकारांवर सार्वजनिक असभ्य वर्तन आणि आपराधिक धमकी देणे असे आरोप लावण्यात आले आहे. हे तीनही पत्रकार राजधानी लखनऊपासून १७० किलोमीटर दूर कानपूरमधील एका स्थानिक चॅनलसाठी काम करतात. या चॅनलवर त्यांनी ही बातमी प्रदर्शित केली होती. परंतु या बातमीवर स्थानिक शिक्षण अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. २४ जानेवारी रोजी उत्तरप्रदेश स्थापना दिवसानिमित्त शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमावेळी हे तीनही पत्रकार कार्यक्रमाला उपस्थितीत नसतानाही त्यांनी विद्यार्थांच्या योगा आणि शारीरिक व्यायामाची अयोग्यरित्या बातमी छापली. असा आरोप जिल्हा शिक्षण अधिकारी सुनिल दत्ता यांनी केला  आहे.

परंतु या कार्यक्रमाच्या फोटोंमध्ये स्पष्ट दिसत आहे की, लहान विद्यार्थी हाफ पॅन्ट, शर्टवर योगा करत होते. तर उपस्थित जिल्हा अधिकारी व व राज्य सरकारचे एक मंत्री आणि स्थानिक आमदार हे थंडीपासून बचाव करण्यासाठी गरम कपडे घालून बसले होते. तर दुसऱ्या फोटोमध्ये विद्यार्थी शीर्षासन करताना दिसत आहे. यावर उत्तर प्रदेश सरकारद्वारे नोंदवण्यात आलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की,  या विद्यार्थ्यांनी फक्त व्यायाम करण्यापूर्तीच हाफ पॅन्ट, शर्ट घातले होते. तर पाोलिसांचे म्हणणे आहे की,  योगा आणि शारीरिक व्यायाम कधीच गरम कपडे घालून करत येत नाही हा नियम आहे. त्यामुळे योगा करण्यासाठी सैल कपड्यांची आवश्यकता होती. त्यामुळे स्थानिक शिक्षण अधिकाऱ्यांनी या नियमाचे पालन करत विद्यार्थ्यांना व्यायाम करण्यापूर्ती थंडीचे कपडे बदलून सैल कपडे घालण्यास सांगितले. व कार्यक्रम संपल्यानंतर विद्यार्थांनी पुन्हा थंडीचे कपडे परिधान केले. यावर कानपूर जिल्हाधिकारी दिनेश चंद्र सिंह यांचे म्हणणे आहे की, या कार्यक्रमात अनुपस्थित असूनही काही पत्रकारांनी विद्यार्थी थंडीने कापत असल्याचे बातमी छापली हे पाहून चिड येत आहे. तुम्हाला माहितीच आहे, योगा हा स्वेटर किंवा कोट पॅन्ट घालून करणे अशक्यच आहे. त्यामुळे या मुलांनी सैल कपड्यात खूप छानप्रकारे व्यायाम केला. परंतु काही लोकांनी यावर अयोग्यप्रकारे बातमी छापली. त्यामुळे यांच्याविरोधात कारवाई केली जात आहे.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -