घरदेश-विदेशशबरीमाला मंदिरात प्रवेशासाठी लढणाऱ्या फतिमाने शेअर केले होते टॉपलेस फोटो

शबरीमाला मंदिरात प्रवेशासाठी लढणाऱ्या फतिमाने शेअर केले होते टॉपलेस फोटो

Subscribe

केरळच्या शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न करणारी रेहाना फतिमा याअगोदरीही टॉपलेस फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यावरुन चर्चेत आली होती.

शबरीमाला मंदिरात प्रवेशासाठी धडपड करणारी समाजिक कार्यकर्ती रेहाना फतिमाने याअगोदर आपले टॉपलेस फोटो सोशल मिडियावर व्हायरल केले होते. जुन्या रुढी, परंपरांना मोडून काढण्यासाठी फतिमा नेहमी प्रयत्नशील असते. काही दिवसांपूर्वी एका प्रोफेसरने महिलांच्या स्तनांची तुलना कलिंगडाशी केली होती. त्यावेळी फतिमाने या गोष्टीचा विरोध करत सोशल मीडियावर एक फोटो टाकला होता. त्या फोटोमध्ये फतिमा टॉपलेस होती आणि फक्त कलिंगडने
तिने आपले स्तन झाकले होते.

‘महिलांच्या शरीराविषयी इतके वादविवाद का ?’

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फतिमा बोलते की, ‘मला कळत नाही महिलांच्या शरीराविषयी इतके वादविवाद का होतात. महिलेच्या शरीरासंबंधित जखडलेल्या सीमारेषांवर मला उत्तरे हवे आहेत. महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळे नियम बनवले गेले आहेत’. फतिमा सांगते की, तिने एकदा आपल्या पतीसोबत स्लीवलेस शर्ट आणि शार्ट्सवर असलेले फोटो सोशल मीडियावर टाकले होते. त्यावेळी तिला नेटकऱ्यांनी ट्रोक करत कमेंटमध्ये शिवीगाळ केली होती. तिला त्या फोटो संदर्भात धमक्या देखील आल्या होत्या. यावर प्रतिक्रीया देताना फतिमाने आपला बिकनीवरचा फोटो सोशल मीडियावर टाकला होता. यावर तिला विचारले प्रश्न विचारले असता ती म्हणते, ‘जितकं तुम्ही रिग्रेसीव कमेंट्सवर लक्ष द्याल, तितके स्वातंत्र्य जखडले जाते. हे माझं शरीर आहे आणि मला जे हवं तेच कपडे मी परिधान करणार’.

- Advertisement -

फतिमा मॉडेलिंगसुद्धा करते

फतिमाने सामाजिक कार्यांबरोबरच सरकारी कर्मंचारीची नोकरीही निबावली आहे. त्याचबरोबर तिने मॉडेलिंग सुद्धा केले आहे. ‘एका’ हा तिचा पहिला चित्रपट असून तिने त्यात इंटरसेक्स व्यक्तीची भूमिका साकारली होती. चित्रपटामध्ये तिने न्यूड सिन्स देखील केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -