घरअर्थसंकल्प २०२२Budget 2022 : शेतकऱ्यांना डिजिटल सेवा पुरवणार, धान्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात,...

Budget 2022 : शेतकऱ्यांना डिजिटल सेवा पुरवणार, धान्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

Subscribe

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. कोरोना काळात आर्थिक फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला रूळावर आणण्यासाठी त्यांच्यासमोर मोठं आव्हान आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना डिजिटल सेवा पुरवण्यात येणार असून धान्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे.

धान्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात

यावर्षी यावर्षी शेतकऱ्यांकडून मोठी धान्यखरेदी करण्यात आली असून धान्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तेलबिया परदेशातून मोठ्या प्रमाणात आयात कराव्या लागतात. त्यामुळे तेलबियांना मोठ्या प्रमाणात प्रधान्य दिलं जाणार आहे. शेत पिकांवर लक्ष ठेवण्यासाठी कृषी ड्रोन्सच्या वापर करण्याला प्रोत्साहन दिलं जाणार आहे. झीरो बजेट फार्मिंगला प्रोत्साहन देण्यासाठी योजना कार्यान्वित केली जाणार आहे. कृषी आधारीत स्टार्टअपला प्रोस्ताहन देण्यासाठी तसेच नाबार्डच्या माध्यमातून स्टार्टअप करणाऱ्या युवकांना आर्थिक मदत केली जाणार आहे, अशी घोषणा निर्मला सीतारमन यांनी केली आहे.

- Advertisement -

जलसिंचन योजनेतून ९.६२ लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येणार

जलसिंचन योजनेतून ९.६२ लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. ६२ लाखांहून अधिक लोकांना पिण्याच्या पाण्याची योजना देण्यात येणार आहे. ५ नदीजोड प्रकल्पांची ब्लू प्रिंट तयार करण्यात आली आहे. नदीजोड प्रकल्पांमधील पाच प्रकल्प हे खूप महत्त्वाचे असून त्याचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना उत्तम प्रतीचं फळ आणि भाज्यांचं उत्पादन करता यावं. यादृष्टीने कशापद्धतीने लागवड करावी आणि कशापद्धतीने फळ आणि भाज्यांची निवड करावी, त्यासाठी केंद्र सरकारची योजना आहे. राज्य सरकारच्या मदतीने शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे.

कृषी आधारित नव्या उद्योगांना कर्ज देणार

कोरोना काळात इमरजन्सी क्रेडीट लाईन गॅरन्टी स्कीम केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये लाखो उद्योजकांना अर्थसहाय्य करण्यात आलं आहे. तसेच त्यांना फायदा देखील झाला. त्याची लोकप्रियता पाहून इमरजन्सी क्रेडीट लाईन गॅरन्टी स्कीम मार्च २०२३ पर्यंत वाढवण्यात येणार आहे. तसेच ५० हजार कोटींची तरतूद यासाठी केली जाणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Budget 2022 : केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार, अर्थमंत्र्यांकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -