घरदेश-विदेशकाँग्रेसचे जेष्ठ नेते सीके जाफर शरीफ कालवश

काँग्रेसचे जेष्ठ नेते सीके जाफर शरीफ कालवश

Subscribe

काँग्रसचे वरिष्ठ नेते सीके जाफर यांचे बंगळुरू येथे वयाच्या ८५ वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते सीके जाफर यांचे बंगळुरूत निधन झाले आहे. ते ८५ वर्षाचे होते. बंगळुरूतील एका खाजगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर काँग्रेसपक्षात हळहळ व्यक्त केली जात आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. बंगळुरूतील कनिंघम रोड येथील पोर्टिस रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते.


राहुल गांधींनी केले ट्विट

त्यांच्या निधनानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ट्विटकरुन त्यांना श्रद्धांजली दिली आहे. सीके जाफर यांचे निधन हे काँग्रेसला झालेले मोठे नुकसान आहे. आमच्यातले एक जेष्ठ नेते आज हरपले. मी त्यांचे मित्र व कुटुंबीयाच्या दुःखात त्यांच्या सोबत आहे. असा संदेश लिहून राहुल गांधी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

- Advertisement -

कोण होते जाफर शरीफ?

सीके जफर शरीफ यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९३३ रोजी झाला होता. ते कर्नाटकच्या राजकारणात सक्रीय होते. काँग्रेस सरकारच्या काळात १९९१ ते ९५ ते रेल्वे मंत्री पदावर होते. पी व्ही नरसिंमा राव यांच्या कार्यकाळात त्यांना मंत्रालयची जवाबदारी देण्यात आली होती. २१ जून १९९१ ते १६ ऑक्टोबर १९९५ पर्यंत त्यांनी रेल्वे मंत्रालयाची जवाबदारी स्विकारली होती. मराठवाड्यात ब्रॉडगेज लोहमार्गाचे निर्माण करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -