घरदेश-विदेशबिहारमध्ये ताप्ती- गंगा एक्स्प्रेसचे १० डबे रुळावरुन घसरले

बिहारमध्ये ताप्ती- गंगा एक्स्प्रेसचे १० डबे रुळावरुन घसरले

Subscribe

बिहारमध्ये ताप्ती गंगा एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले. छपरा -बलिया स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे. ताप्ती गंगा एक्स्प्रेसचे १० डबे रुळावरुन घसरले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ८ वाजता गौतमस्थान स्थानकाजवळ अचाकन छपरा एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले. घटनास्थळी रेल्वे पोलिसांनी धाव घेतली आहे. बचावकार्य युध्दपातळीवर सुरु आहे.

- Advertisement -

ताप्ती गंगा एक्स्प्रेसचे १० डबे रुळावरुन घसरुन ४ प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. आज सकाळी ८ वाजता ही दुर्घटना घडली. छपरा स्टेशनवरुन सुरतकडे निघालेली एक्स्प्रेसचे १४ डबे छपरा -बलिया स्थानकादरम्यान रुळावरुन घसरले. या घटनेची माहिती मिळाताच स्थानिक नागरिक आणि रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. ४ रेल्वे प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरल्यामुळे रेल्वे सेवा पूर्णत: ठप्प झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -