घरदेश-विदेशकाबूल सेफ झोन? संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत फ्रान्स, ब्रिटन सादर करणार प्रस्ताव!

काबूल सेफ झोन? संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत फ्रान्स, ब्रिटन सादर करणार प्रस्ताव!

Subscribe

फ्रान्स आणि ब्रिटन सोमवारी संयुक्त राष्ट्रांच्या आपत्कालीन बैठकीत काबुलला ‘सेफ झोन’ म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव ठेवणार असल्याचे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सांगितले. मॅक्रॉन यांनी फ्रेंच वृत्तपत्र ‘ले जनरल डु दिमांचे’ मध्ये प्रकाशित केलेल्या मुलाखतीत असे म्हटले की, आमच्या प्रस्तावाचा उद्देश काबूलला सुरक्षित क्षेत्र निश्चित करणे आहे. या भागातून मानवतावादी मदत कार्य केले जाईल. तसेच यानंतर मॅक्रॉन यांनी इराकच्या मोसुलमध्ये यासंदर्भात असे सांगितले की, या प्रस्तावाचे स्वागत होईल अशी अपेक्षा आहे. कोणीही मानवतावादी मदत कार्याच्या संरक्षणास विरोध करेल, असे मला वाटत नसल्याचेही त्यांनी म्हटले.

संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी संयुक्त राष्ट्रात अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर ही बैठक बोलावली आहे. ज्यामध्ये ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका, चीन आणि रशिया हे महत्त्वाचे सदस्य देश सहभागी होणार आहेत. तसेच मॅक्रॉन यांनी शनिवारी सांगितले की, फ्रान्स अफगाणिस्तानमधील आलेल्या संकटाबाबत मदत करण्याच्या पार्श्वभूमीवर तालिबानशी प्राथमिक चर्चा करत आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांना देशाबाहेर काढण्याबाबत चर्चा सुरू आहे.

- Advertisement -

दरम्यान, ब्रिटनच्या रस्त्यावर तालिबानविरोधी निदर्शने सुरूच आहेत. .यासोबतच लंडनमध्ये हजारो लोकांनी आपला सहभाग नोंदविला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून हे आंदोलन सातत्याने सुरू असल्याचे चित्र आहे. तर ब्रिटनमध्ये केंद्रित असलेले विविध अफगाण समुदाय आणि नेत्यांनी मोर्चाचे आयोजन केले आहे. यावेळी लोकांनी तालिबानचा जुलूम, दहशतवादी हल्ले तसेच आंतरराष्ट्रीय शक्ती आणि तेथील प्रादेशिक शक्तींनी निर्माण केलेल्या संकटाला जोरदार विरोध केला आहे.


धक्कादायक! अफगाणिस्तानातील आत्मघाती हल्ल्यांची सूत्रधार ISIS-K संघटनेत भारतीयांचाही समावेश

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -