घरताज्या घडामोडीVideo Viral: पाकव्याप्त काश्मीरमधील सामूहिक बलात्कार पीडितेची पंतप्रधान मोदींकडे मदतीची हाक

Video Viral: पाकव्याप्त काश्मीरमधील सामूहिक बलात्कार पीडितेची पंतप्रधान मोदींकडे मदतीची हाक

Subscribe

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधील एका सामूहिक बलात्कार पीडित महिला गेल्या सात वर्षांपासून न्यायाची लढाई लढत आहे. परंतु अपयश येत आहे. उलट न्यायापासून वंचित असलेल्या पीडितेला धमक्या दिल्या जात आहे. ती जीव वाचवण्यासाठी घरोघरी भटकत आहे. आता पीडितेने भारतात शरण येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींना भावूक व्हिडिओ संदेश पाठवून तिच्या कुटुंबियांचे रक्षण करण्यासाठी मदत मागितली आहे. यावेळी तिने पंतप्रधान मोदींना सांगितले की, ‘पाकिस्तानमध्ये मला, माझ्या पती आणि मुलाच्या जीवाला धोका आहे.’

या पीडितेचे नाव मारिया ताहिर असे असून ती म्हणाली की, ‘मी गेल्या सात वर्षांपासून न्यायासाठी लढत असलेली एक सामूहिक बलात्कार पीडिता आहे. पाकिस्तानी पोलीस, सरकार आणि न्यायव्यवस्था मला न्याय देण्यास अपयशी ठरली आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करते की, आम्हाला भारतात येण्याची परवानगी द्या. माझ्या मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. स्थानिक पोलीस आणि एक वरिष्ठ नेता चौधरी तारिक फारूक मला आणि माझ्या मुलाला केव्हाही ठार मारतील. त्यामुळे आम्हाला आश्रय आणि सुरक्षा द्या अशी मी पंतप्रधान मोदींना विनंती करते.’

- Advertisement -

मारिया २०१५ साली घडलेल्या या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी घरोघरी फिरत आहे. पूर्वीच्या व्हिडिओमध्ये त्या घटनेसंबंधित सांगितले आहे. तिने म्हटले की, ‘हारून रशीद, ममून रशीद, जमील शफी, वकास अश्रफ, सनम हारून आणि आणखी तिघांचा या गुन्हा सहभाग असल्याचे सांगितले आहे. यासंदर्भात तिने पोलीस आणि स्थानिक नेत्यांशी संपर्क साधला, पण न्याय मिळू शकला नाही. एवढेच नाहीतर पाकिस्तान व्याप्त काश्मीरच्या मुख्य न्यायमूर्तींसह स्थानिक अधिकाऱ्यांना बरीच पत्र लिहिली.’ पाकव्याप्त काश्‍मीरमधील अनेक बलात्कार पीडित आणि त्यांचे कुटुंबिय गुन्हेगारांचा सार्वजनिक स्वरुपात सामना करण्यास पुढे येण्यास घाबरतात. कारण त्यांना त्यांच्या समुदायाने सोडून दिले जाण्याची भीती वाटते.

- Advertisement -

हेही वाचा – President and Vice President Election 2022 : राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पदासाठी यंदा महिलांना मिळणार संधी?


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -