घरदेश-विदेशgold price dhanteras : धनत्रयोदशीला यंदा सोन्यात ८३०० रुपयांची घसरण, जाणून घ्या...

gold price dhanteras : धनत्रयोदशीला यंदा सोन्यात ८३०० रुपयांची घसरण, जाणून घ्या आजचे दर

Subscribe

धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदीचा ट्रेंड पाहायला मिळतो. आज कुबेराची जयंती म्हणून धनत्रयोदशीला सोनं आणि चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे. त्यामुळे तुम्हीही या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्य़ासाठी आनंदाची बातमी आहे. कारण आज धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातही आज घसरणीचा कल दिसून येत आहे. आज MCX वर सोने ०.१७ टक्क्यांनी खाली आले असून ४७,८२२ प्रति तोळा झाले आहे. तर चांदी ०.२५ टक्के घसरुन ६४,६२९ प्रति किलो झाली आहे. त्यामुळे कोरोनामुळे विस्कटलेली आर्थिक घडी सुधारण्यासासाठी यंदा धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या मुहूर्तावर सराफा, ज्वेलर्स चांगल्या उलाढालीची अपेक्षा करत आहेत. २०२० मध्ये MCX वर सोने ५६,२०० रुपये प्रति तोळा झाले होते. तर २०२१ मध्ये यंदा MCX वर १० ग्रॅम सोने ४७,८३५ रुपये झाले आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचा दर ८३६५ रुपयांनी कमी झाला आहे. मागील वर्षी हा दर ५६,२०० रुपये इतका होता.

- Advertisement -

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेड म्हणजेच IBJA नुसा आज सोन्या-चांदीचा दर असे आहेत- (या किमती GST शुल्काशिवाय प्रति ग्रॅम दिल्या आहेत)

९९९ (शुद्धता) -४७,७५४
९९५- ४७,५६३
९१६- ४३,७४३
७५०- ३५,८१६
५८५- २७,९३६
चांदी ९९९- ६४,१९६

- Advertisement -

मुंबई, पुणे सारख्य़ा शहरातील सोन्या-चांदीचे दर?

शहर     २२ कॅरेट सोने      २४ कॅरेट सोने      चांदी (किलो)
मुंबई        ४७, ७४०        ४७, ७४०         ६४,६००
पुणे         ४६,०५०          ४९,३२०           ६४,६००
नागपूर     ४६,७४०          ४७,७४०           ६४,६००
दिल्ली     ४६,८५०          ५१,१००            ६४,६००
चेन्नई       ४५,०००          ४९,१००               –


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -