घरताज्या घडामोडीDadra Nagar Haveli bypolls result: शिवसेनेच्या कलाबेन डेलकर दादरा नगर हवेलीत आघाडीवर,...

Dadra Nagar Haveli bypolls result: शिवसेनेच्या कलाबेन डेलकर दादरा नगर हवेलीत आघाडीवर, भाजप कायम पिछाडीवर

Subscribe

देशात लोकसभेच्या ३ आणि सर्व राज्यांसह २९ विधानसभा जागांवर मतमोजणी सुरु आहे. यामधील दादरा नगर हवेली लोकसभा निवडणूक तर महाराष्ट्र नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या निाकालावर महाराष्ट्राचे विशेष लागले आहे. आतापर्यंत या दोन्ही जागांवर भाजप मोठ्या प्रमाणात पिछाडीवर आहे. दादरा नगर हवेलीमधील पोटनिवडणूक भाजप आणि शिवसेनेमध्ये चुरशीची ठरत आहे. तर देगलूरमध्ये महाविकास आघाडीने चांगलीच मुसंडी मारली असल्याचे दिसत आहे. अशाच प्रकारे आघाडी कायम राहिली तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा आणि दादरा नगर हवेलीमध्ये शिवसेनाचा विजय निश्चित होईल.

दादरा नगर हवेलीत खासदार मोहन डेलकर यांच्या निधनानंतर एक जागा रिक्त होती. या जागेवर लोकसभा पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर शिवसेनेकडून निवडणूक लढवत असून भाजपला चांगलेच आव्हान दिलं आहे. शिवसेनेच्या कलाबेन डेलकर १५ हजार ३३५ मतांनी आघाडीवर आहेत. भाजपच्या महेश गावितांना २९ हजार ३८८ मत मिळाली आहेत. तर कलाबेन डेलकर यांना एकूण ४४ हजार ७२३ मत मिळाली असून त्या अघाडीवर आहेत. काँग्रेसचे महेश दोडींना १ हजार ९४७ मतं मिळाली असून ते तिसऱ्या स्थानी आहेत.

- Advertisement -

दादरा नगर हवेलीमध्ये कलाबेन डेलकर यांचा विजय जवळ जवळ निश्चित मानला जात आहे. परंतु भाजप आणि शिवसेनेमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. शिवसेना ही निवडणूक जिंकली तर महाराष्ट्राबाहेरील पहिला खासदार लोकसभेवर जाईल.

देगलूरमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार आघाडीवर

नांदेडमधील देगलूर-बिलोली पोटनिवडणूकीमध्ये महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे. भाजप सुरुवातीपासूनच पिछाडीवर दिसत आहे. अकराव्या फेरीमध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांना ४० हजार ५२३ मत मिळाली आहेत. तर सुभाष साबणे हे २७ हजार ९४३ मतांसह पिछाडीवर आहे. वंचितचा उमेदवाराला ४०४७ मिळाली आहे. जितेश अंतापूरकर हे १२ हजार ५८० मतांनी आघाडीवर आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : समीर वानखेडे ७० हजाराचा शर्ट तर अडीच लाखांचे बूट वापरतात, नवाब मलिकांचा नवा खुलासा


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -