घरताज्या घडामोडीघर बांधणाऱ्यांसाठी खुशखबर! स्वप्न होईल लवकरच साकार

घर बांधणाऱ्यांसाठी खुशखबर! स्वप्न होईल लवकरच साकार

Subscribe

स्वत: चे घर तयार करायची स्वप्न पाहात असाल तर ते स्वप्न सत्यात साकारणे सोपे आहे. त्याच कारणही तसेच आहे. गेल्या एक आठवड्यांपासून सीमेंट पासून रेती लोखंडी रॉड आणि विटांच्या किंमतीतत सातत्याने घट होताना दिसत आहे.

आपलं स्वत:चं हक्काचं घर असणे हे स्वप्न सर्वंच जण पाहत असतात. मात्र वाढत्या महागाईमुळे घर विकत घेणे ही खूप कठिण गोष्ट झाली आहे. त्यामुळे घराचं स्वप्न अधुरेच राहते. काही लोकांना घर विकत घेण्यापेक्षा आपल्याला हवे तसे घर बांधायचे स्वप्न असते. मात्र रेती, सिमेंट, विटांच्या किंमती काही परवडणाऱ्या नसतात. लॉकडाऊनच्या काळात लोकांचे मोठे नुकसान झाले. मात्र आता स्वत: चे घर बांधायची करायची स्वप्न पाहात असाल तर ते स्वप्न सत्यात साकारणे सोपे आहे. त्याच कारणही तसेच आहे. गेल्या एक आठवड्यांपासून सिमेंट पासून रेती, लोखंडी रॉड आणि विटांच्या किंमतीतत सातत्याने घट होताना दिसत आहे. फेब्रुवारी पर्यंत लोखंडी रॉडच्या किंमती जवळपास १ हजार रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात तुम्ही तुमचे हक्काचे आणि तुम्हाला हवे तसे घर बांधू शकता.

काही दिवसांपासून लोखंडी रॉड ५६ हजार क्विंटलने विकले जात आहे. १ फेब्रुवारी पासून या किंमतीत सातत्याने घट होत आहे. आता लोखंडी रॉडची किंमत ४७ हजार रुपये इतकी झाली आहे. त्याचबरोबर सिमेंटच्या किंमतीतही घट झालेली पहायला मिळत आहे. आधी सिमेंटची एक बॅग ४१० रुपयांना विकली जात होती. तिच सिमेंटची बॅग आता ३८० रुपयांनी विकली जात आहे.

- Advertisement -

लोखंडी रॉड, सिमेंट याचबरोबर विटांच्या किंमतीतही घट झालेली पहायला मिळत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून विटांच्या किंमतीत सातत्याने घट होताना पहायला मिळत आहे. विटांच्या किंमतीत तब्बल ७०० रुपयांनी घट झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी विटा ५५ हजार रुपयांना विकल्या जात होत्या त्याच विटांची किंमत आता ४८ हजार रुपयांवर आली आहे. घर तयार करण्यासाठी लागणाऱ्या मुख्य आणि महत्त्वाच्या वस्तू आहेत. या वस्तू स्वस्त झाल्याने घर तयार करण्याचे सोपे होईल. त्यामुळे घराचे स्वप्न पाहणाऱ्यांचे स्वप्न साकार होण्याची ही चांगलीच संधी आहे.


हेही वाचा – भारतातील ट्विटरच्या पब्लिक पॉलिसी हेड महिमा कौल यांचा राजीनामा

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -