Best of Luck : पुणे विद्यापीठाच्या परिक्षांच्या तारखा जाहीर

पुणे विद्यापीठाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Pune University
पुणे विद्यापीठ

पुणे विद्यापीठाच्या परीक्षांच्या अखेर तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, आता या परीक्षा घरातून ऑनलाईन पद्धतीने होणार की महाविद्यालय स्तरावर होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. याबाबतचा निर्णय उपसमितीचा अहवाल आल्यानंतर पुढील चार ते पाच दिवसात घेतला जाणार आहे.

ऑनलाईन पद्धतीने होणार परीक्षा

पुणे विद्यापीठाची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या प्रथम सत्राची परीक्षा येत्या १५ मार्चपासून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. तर द्वितीय वर्ष ते अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा १५ ते २० मार्च या कालावधीत घेण्यात येईल तर प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ३० मार्चपासून सुरु होणार आहे. तर अंतिम वर्षाच्या बॅकलॉकच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन आणि प्रॉक्टर्ड पद्धतीने घेतली जाईल, अशी माहिती विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय चाकणे यांनी दिली आहे.

परीक्षांचा निकालही लागणार लवकरच

पुणे विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. त्यामुळे मोबाईल किंवा लॅपटॉपवरुन विद्यार्थ्यांना परीक्षा देणे सोपे जाईल. तसेच वेळेची बचतही होणार आहे. विशेष म्हणजे परीक्षांचा निकालही लवकर लागणार आहे.

परीक्षेचे केले जाणार नियोजन

गुणवत्ता, गैरप्रकारांना रोखण्यासाठी परीक्षेचे नियोजन केले जाणार आहे. यावर चर्चा करुन योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे.


हेही वाचा – मराठीतही पॉर्न व्हिडिओचा सुळसुळाट!