घरटेक-वेकगुगल हँगआऊट होणार हद्दपार

गुगल हँगआऊट होणार हद्दपार

Subscribe

येत्या २०२० मध्ये हँगआऊट अॅप बंद होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता हँगआऊट अॅपचा वापर करणाऱ्या युजर्सना याचा फटका बसणार आहे.

प्रत्येक जण आजकाल सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असतं. व्हॉटसअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, हँगआऊट आणि हल्ली तरुणांमध्ये सगळ्यात जास्त वापरले जाणारे टिकटॉक. जर तुम्हाला काही मिनिटांपुरत या सगळ्या सोशल साईटसपासून दूर केले तर अगदी बैचेन झाल्यासारखे होते. मात्र आता यामधील एक चॅट आता बंद होणार आहे. गुगलचं मेसेजिंग अॅप हँगआऊट येत्या २०२० मध्ये बंद होणार असल्याची शक्यता आहे. अशी माहिती 9 to 5Google ने सूत्रांनी दिली आहे. यामुळे जीमेलचे बहुसांश युजर्सना याचा फटका बसणार आहे. मात्र गुगल प्ले स्टोरवर अजूनही हँगआऊट अॅपवर उपलब्ध आहे.


वाचा – आजची पिढी सेलफोन आणि सोशल मीडियाची गुलाम!

- Advertisement -

का केले जात आहे हँगआऊट बंद

२०१३ मध्ये गुगलनं जी – चॅटऐवजी हँगआऊट हे नवं अॅप युजर्सच्या भेटीस आणले होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून कंपनीनं या अॅपमध्ये अपडेट करणं बंद केलं आहे. याशिवाय मेसेजिंग सुविधाही बंद केली असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र गुगल प्ले स्टोरवर अजूनही हँगआऊट अॅप उपलब्ध आहे. गुगल हँगआऊट हे संवाद आणि संपर्काच चांगलं माध्यम आहे. मेसेजिंग, व्हिडिओ चॅटिंग, एसएमएस आणि व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल आदी फीचर्ससह ते कंपनीनं लॉंच केलं होतं. परंतु आता हे अॅप जुने वाटू लागले आहे आणि ते हाताळण्यात अनेक अडचणी येत आहेत. याशिवाय अनेक वेळा बग्स येतात यामुळे त्याचा युजर्सना त्रास होत आहे. असं म्हणणं अनेक युजर्सनं मांडल्याचं 9 to 5Google च्या एका अहवालात म्हटलं आहे.


वाचा – सोशल मीडिया पोस्ट वॉरने मुंब्य्रातील नागरिक हैराण

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -