घरमुंबईपॉर्न बघून बापचं करायचा मुलीसोबत अश्लिल कृत्य

पॉर्न बघून बापचं करायचा मुलीसोबत अश्लिल कृत्य

Subscribe

पीडित मुलगी घरामध्ये एकटी असल्यावर त्याचा फायदा घेऊन पॉर्न पाहून बाप तिच्याकडून हस्तमैथून करुन घ्यायचा. आरोपी बापाला पोलिसांनी अटक केली आहे.

पॉर्न पाहून स्वत:च्याच अल्पवयिन मुलीला हस्तमैथून करायला लावणाऱ्या बापाला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतल्या अंधेरीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. डी. एन नगर पोलिसांनी आरोपी निराधम बापाला अटक केली आहे. मुलीने आईकडे वडिलांबाबतची तक्रार दाखल केल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला आहे. महिलेने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी बापाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अवघ्या काही तासातच बापाला बेड्या ठोकल्या.

दारुच्या नशेत करायचा हे कृत्य

डी एन नगर पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाप कलीमुद्दीन मुस्तकीन शेख (४०) त्याच्या १३ वर्षाच्या मुलीसोबत अश्लिल चाळे करायचा. पीडित मुलगी घरामध्ये एकटी असल्यावर त्याचा फायदा घेऊन पॉर्न पाहून तिच्याकडून हस्तमैथून करुन घ्यायचा. पीडित मुलीने ही गोष्ट तिच्या आईनला सांगितली. त्यानंर महिलेने डी एन नगर पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी बाप कलीमुद्दीन मुस्तकीन शेखविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपी बापाला डी एन नगर पोलिसांनी रात्री अटक केली.

- Advertisement -

पोलीस कोठडीत रवानगी

आरोपी दारुच्या नशेत असल्यावर हे कृत्य करायचा. त्यानंतर मुलीला जीवे मारण्याची धमकी द्यायचा. आरोपी एजंटचे काम करतो. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला कोर्टामध्ये हजर केल्यानंतर त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. डी एन नगर पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -