घरदेश-विदेशUPI पेमेंटवर येणार मर्यादा; अनियंत्रित पेमेंटवर निर्बंध आणण्यासाठी हालचाली

UPI पेमेंटवर येणार मर्यादा; अनियंत्रित पेमेंटवर निर्बंध आणण्यासाठी हालचाली

Subscribe

युपीआय पेमेंट ॲप ( UPI Payment App ) वापरणाऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे, कारण आरबीआय आता UPI पेमेंटवर निर्बंध लादण्याच्या तयारीत आहे. बँक व्यवहारांप्रमाणेच आता UPI पेमेंटवर मर्यादा घालण्याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी बोलणं सुरु आहे. सध्याच्या ऑनलाईन पेमेंटचा वापर मोठ्याप्रमाणात होतोय, घरातील वस्तूंच्या खरेदीपासून ते बँकेच्या कामांपर्यंत सर्व काम ऑनलाईन होतात. त्यामुळे UPI पेमेंटवर अनेकजण अवलंबून आहेत. छोट्या- मोठ्या वस्तूंच्या खरेदीसाठी युपीआय पेमेंटचा वापर होतो. यामुळे सर्व व्यवहार सुरु होत आहेत. मात्र आता युपीआय पेमेंटवरही निर्बंध येण्याची शक्यता आहे.

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच UPI ही रिअल टाइम पेमेंट सिस्टम आहे. यामुळे मोबाईल ॲपद्वारे कोणत्याही बँक अकाउंटमध्ये पैसे पाठवता येतात. यासह युजर्स UPI ॲप्ससह बँक अकाउंट लिंक करत विविध व्यवहार करु शकतात. मात्र आता UPI पेमेंट सेवा देणाऱ्या अनेक अॅप्सवर व्यवहार मर्यादा निश्चित करण्याची तयारी सुरु आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) देशातील थर्ड पार्टी ॲप प्रोव्हायडरची (TPAP) व्हॉल्यूम कॅप 30 टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्याची तयारी करत आहे. यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India ) सोबत चर्चा सुरू आहे. व्हॉल्यूम कॅप ( Volume Cap ) म्हणजे विशिष्ट प्रकारच्या खाजगी कंपन्यांसाठी कर-सवलत आहे.

- Advertisement -

NPCI च्या या निर्णयामुळे Google-Pay आणि Phone-Pay सारख्या कंपन्यांसमोर अडचणी निर्माण होऊ शकतात. सध्या कोणतीही मर्यादा निश्चित न केल्यामुळे या क्षेत्रातील दोन्ही कंपन्यांचा बाजारातील हिस्सा जवळपास 80 टक्के आहे. NPCI ने या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी 31 डिसेंबर 2022 ही तारीख निश्चित केली आहे. या संदर्भात जारी करण्यात आलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, NPCI सध्या सर्व शक्यतांचे मूल्यांकन करत असून मुदत वाढविण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

प्रत्येक बँक UPI व्यवहारासाठी म्हणजे पैसे पाठवणे आणि प्राप्त करणे यासाठी दैनिक मर्यादा निश्चित करते. देशातील सर्वात मोठी बँक SBI ची UPI व्यवहार मर्यादा 1 लाख रुपये आहे. तुम्ही दररोज 1 लाख रुपयांचे व्यवहार करू शकता. याशिवाय, ICICI बँकेची UPI दैनिक व्यवहार मर्यादा 10,000-10,000 रुपये आहे. परंतु Google Pay युजर्स 25,000 रुपयांपर्यंत व्यवहार करू शकतात.


व्यायाम न करता अशा प्रकारे करा वजन कमी; आठवड्याभरात व्हा फिट

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -