घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रधक्कादायक ः ट्रॅक्टरशी खेळणे बेतले जीवावर; एक वर्षाचा चिमुकला ठार

धक्कादायक ः ट्रॅक्टरशी खेळणे बेतले जीवावर; एक वर्षाचा चिमुकला ठार

Subscribe

खेळता-खेळता मुलांनी चावी फिरवल्याने चालू ट्रॅक्टरने एक वर्षीय चिमुकल्याला धडक दिली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना एकलहरे येथील मातोश्री कॉलेजजवळील सोनू सरदूसेंच्या वीटभट्टीच्या आवारात घडली. अनिकेत लवकुश गौतम (वय १ वर्ष, रा. सरदुसे यांची वीटभट्टी, एकलहरे) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.

पोलीस अंमलदार एन. पी. गायकवाड यांच्या तक्रारीनुसार, सदरील घटना शनिवारी (दि. ३०) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. अनिकेत वीटभट्टी आवारात खेळत होता. त्यावेळी ट्रॅक्टर उभा होता. ट्रॅक्टरला चावीही लावली होती. मुलांनी ती चावी फिरविल्याने ट्रॅक्टर चालू झाला आणि ट्रॅक्टरची धडक अनिकेतला बसली. त्यात त्याचा मृत्यू झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -