घरदेश-विदेशHathras Rape Case: 'अधिकारी म्हणत होते तुम्हाला पैसे मिळतील'; पीडितेच्या आईचा खुलासा

Hathras Rape Case: ‘अधिकारी म्हणत होते तुम्हाला पैसे मिळतील’; पीडितेच्या आईचा खुलासा

Subscribe

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरुन देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी चौकशीसाठी SIT ची टीम तयार करण्यात आली असून SIT चे अधिकारी पीडित मुलीच्या घरी चौकशीसाठी गेले होते. यावेळी या अधिकाऱ्यांनी तुमच्या खात्यात किती पैसे आले हे तुम्हाला माहित आहे का? असं वविचारलं, असा खुलासा पीडितेच्या आईने केला आहे.

“SIT ची टीम आणि इतर अधिकारी जेव्हा घरी आले तेव्हा ते बोलत होते की, तुम्हाला पैसे मिळणार आहेत…अरे तुम्हाला पैसे मिळणार आहेत…तुम्हाला माहित नाही की तुमच्या खात्यात किती पैसे आले?” असं अधिकारी म्हणत होते अशी माहिती पीडितेच्या आईने दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या. मला माहित नाही आमच्या खात्यात किती पैसे आले. परंतु, आम्हाला न्याय पाहिजे असं पीडितेच्या आईने चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना सांगितलं. “या प्रकरणी कोणत्या अधिकाऱ्याला हटवण्यात आलं याची माहिती आपल्याला नाही. आम्हाला या प्रकरणाचा तपास सीबीआयकडूनही नको. या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायधीशांमार्फत झाला पाहिजे. त्यांच्या अध्यक्षतेखाली तपास झाला पाहिजे,” अशी मागणीही पीडितेच्या आईने केली.

- Advertisement -

१४ सप्टेंबरला दिलेल्या जबाबा बाबत विचारलं असता, “त्या दिवशी आम्ही दोघीही घाबरलो होतो. माझी मुलगीही घाबरली होती. या ठिकाणाहून तिला लवकर घेऊन जा असं लोक सांगत होते. ज्यावेळी माहिती मिळाली त्यावेळी त्या ठिकाणी तपास करण्यात आला,” असं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी नार्को टेस्टबद्दलही माहिती दिली. नार्को टेस्ट कराय असते आपल्याला माहित नाही. आम्ही ती टेस्ट करणार नाही, असं पीडितेच्या आईने सांगितलं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -