घरदेश-विदेशभाजप खासदार हेमा मालिनींच्या गालाची थेट रस्त्याशी तुलना, आता हेमा मालिनी म्हणतात...

भाजप खासदार हेमा मालिनींच्या गालाची थेट रस्त्याशी तुलना, आता हेमा मालिनी म्हणतात…

Subscribe

बोदवड नगरपंचायत प्रचारसभेत गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना लक्ष्य केले होते. गेली ३० वर्ष एकनाथ खडसे या भागात आमदार आहेत. पण अजूनही ते रस्ते चांगले करू शकले नाहीत, असा टोला लगावताना पाटील यांची जीभ घसरली.

नवी दिल्लीः शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांच्या गालाची तुलना थेट रस्त्यांशी केली होती, त्यावरून मोठा गदारोळही झाला होता. विशेष म्हणजे गुलाबराव पाटलांनी माफीसुद्धा मागितली होती. त्यानंतर आता हेमा मालिनी यांनी या सर्व प्रकारावर संताप व्यक्त केलाय. अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनींनी एएनआय वृत्तसंस्थेकडे आपली भावना व्यक्त केलीय.

“अशा प्रकारच्या विधानांचा ट्रेंड काही वर्षांपूर्वी लालूजींनी सुरू केला होता आणि तेव्हाही अनेकांनी हा ट्रेंड फॉलो केला होता. अशा प्रकारची टीका योग्य नाही,” असे भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांनी म्हटलेय. तसेच महाराष्ट्रातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी गालाची तुलना रस्त्यांशी करणं योग्य नसल्याचंही अधोरेखित केलंय.

- Advertisement -

बोदवड नगरपंचायत प्रचारसभेत गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना लक्ष्य केले होते. गेली ३० वर्ष एकनाथ खडसे या भागात आमदार आहेत. पण अजूनही ते रस्ते चांगले करू शकले नाहीत, असा टोला लगावताना पाटील यांची जीभ घसरली. माझ्या धरणगाव मतदारसंघात बघा, हेमा मालिनीच्या गालासारखे गुळगुळीत रस्ते मी केलेत. पाटील यांनी हे विधान खडसे यांना डिवचण्यासाठी जरी केले असले तरी ते एका महिलेप्रति वापरले गेल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापलेय. अनेक राजकीय नेत्यांनी पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. भाजपच्या चित्रा वाघ यांनीही गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.


तसेच भाजपने पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरलीय. यामुळे अडचणीत आलेल्या पाटील यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. पण तरीही विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने गुलाबराव पाटील यांनी माझ्या भाषणातील वक्तव्यामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे सांगत जाहीर माफी मागितली होती. यामुळे दिवसभर रंगलेल्या या नाट्यावर सध्या जरी पडदा पडला असला तरी भाजपमधून मात्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होतेय.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -