panama papers leak: ऐश्वर्या राय ईडी कार्यालयात हजर

Aishwarya Rai bachchan arrives at the ED office

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला पनामा पेपर लीक प्रकरणी ईडीकडून समान्स बजावण्यात आले होते. ऐश्वर्याला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, ऐश्वर्या आज दिल्ली ईडी कार्यालयात चौकशीसाठी पोहचली आहे. ऐश्वर्याला या आधी दोन वेळा ईडीकडून याप्रकरणाच्या चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. मात्र ऐश्वर्याने दोन्ही वेळीची चौकशी पुढे ढकलण्याची विनंती केली. मात्र आज तिसऱ्या समन्सनंतर ऐश्वर्या ईडी कार्यालयात पोहचली आहे. ऐश्वर्या राय ला ईडीने फेमा प्रकरणात समन्स बजावला होता. ९ नोव्हेंबरला प्रतीक्षा बंगला या तिच्या राहत्या घरी तिला समन्स पाठवण्यात आला होता. ईडीने १५ दिवसात ऐश्वर्याकडून याचे उत्तर मागितले होते. ऐश्वर्याने ईमेल द्वारे याचे उत्तर दिले होते.

पनामा पेपर्स लिक प्रकरणात देशातील अनेक मोठ्या व्यक्तींची नावे आहेत. ऐश्वर्या राय बच्चनचा पती अभिनेता अभिषेक बच्चनला देखील एक महिन्यापूर्वी ईडी कार्यालयात पोहचला होता. त्याची देखील चौकशी करण्यात आली. मिळालेल्या महितीनुसार बिग बी अमिताभ बच्चन यांना देखील या प्रकरणात ईडीकडून नोटीस जारी करण्यात आली आहे.

पनामा पेपर्स लीक प्रकरणात एका कंपनीचे अधिकृत कागदपत्र लीक झाले होते आणि हा डेटा Süddeutsche Zeitung (SZ) या वृत्तपत्रामधून ३ एप्रिल २०१६ साली जाहीर करण्यात आला. यात देशातील २०० हून अधिक व्यक्तींची नावे आहेत. ज्यात प्रसिद्ध व्यावसायिक, सेलिब्रेटी आणि राजकारणींची नावे आहे. ज्यांच्यावर मनी लाँड्रिंगचे आरोप लावण्यात आले आहेत.


हेही वाचा – Panama Papers Leak: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला ईडीचा समन्स