घरक्राइमसिंध प्रांतात 15 वर्षीय हिंदू मुलीचे अपहरण, पाकिस्तानमध्ये 15 दिवसांत चौथी घटना

सिंध प्रांतात 15 वर्षीय हिंदू मुलीचे अपहरण, पाकिस्तानमध्ये 15 दिवसांत चौथी घटना

Subscribe

पाकिस्तानातील सिंध प्रांतातून एका 15 वर्षीय हिंदू मुलीचे अपहरण केल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच तीन हिंदू महिलांचे अपहरण करून त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले होते.

पाकिस्तानातील सिंध प्रांतातून एका 15 वर्षीय हिंदू मुलीचे अपहरण केल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच तीन हिंदू महिलांचे अपहरण करून त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले होते. चंद्रा मेहराज असे या मुलीचे नाव आहे. हैदराबादच्या फतेह चौक परिसरातून अपहरण करण्यात आले होते. (hindu girl abducted in hyderabad fourth incident in pakistan in last 15 days)

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या सिंध प्रातातील हैदराबाद येथून या मुलीचे अपहरण करण्यात आले होते. घरी परतत असताना तिचे अपहरण करण्यात आले होते. चंद्राच्या अपहरणानंतर तिच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनंतर पोलिसांनी अधिक तपासाला सुरूवात केली.

- Advertisement -

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रा मेहराज यांचे हैदराबादच्या फतेह चौक परिसरातून अपहरण करण्यात आले होते. त्यावेळी ती घरी परतत होती. याप्रकरणी तपास सुरू असून, मुलीचा शोध अद्याप लागलेला नाही. पाकिस्तानात अल्पसंख्याक हिंदूंवर अत्याचार सुरूच असल्याचे या घटनेवरून सिद्ध होते. यापूर्वी 24 सप्टेंबर रोजी नसरपूर परिसरातून 14 वर्षीय मीना मेघवारचे अपहरण करण्यात आले होते. मीरपूर खास येथे अशाच प्रकारे आणखी एका मुलीचे अपहरण करण्यात आले.

पाकिस्तानच्या लोकसंख्येच्या 3.5 टक्के हिंदू आणि इतर अल्पसंख्याक आहेत. या इस्लामिक देशात क्रूरता, हिंसाचार आणि दडपशाहीची प्रकरणे वारंवार समोर येत आहेत. पण, गेल्या वर्षी संसदीय समितीने देशात सक्तीच्या धर्मांतराविरोधातील विधेयकाचा मसुदा फेटाळला. याच शहरात रवी कुर्मी नावाच्या हिंदूने पत्नी राखीचे अपहरण करून जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारल्याचा आरोप केला होता. याउलट राखीने इस्लाम धर्म स्वीकारला आणि अहमद चांडियोसोबत स्वखुशीने लग्न केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

- Advertisement -

पाकिस्तानमध्ये हिंदूंवर अत्याचाराची मालिका सुरू आहे. जूनमध्ये करीना कुमारीने कोर्टात साक्ष दिली की, तिचे अपहरण करून मुस्लिम पुरुषाशी लग्न केल्यानंतर तिला इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले. यापूर्वी सतरन ओड, कविता भील आणि अनिता भील या तीन हिंदू मुलींसोबत अशाच घटना घडल्या होत्या.

21 मार्च रोजी साखर येथे पूजा कुमारी नावाच्या हिंदू मुलीची तिच्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तिने पाकिस्तानी पुरुषाशी लग्न करण्यास नकार दिला होता.


हेही वाचा – बाळासाहेब ठाकरें ऐवजी नरेंद्र मोदी, अमित शहांच्या नावाने चिन्ह मागा; राष्ट्रवादीची टीका

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -