घरमहाराष्ट्रपुणेMedha Kulkarni : पक्षाने पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी...

Medha Kulkarni : पक्षाने पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी कृतज्ञ – मेधा कुलकर्णी

Subscribe

पुणे : भाजपाकडून राज्यसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी (13 फेब्रुवारी) भाजपामध्ये प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली असून भाजपाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर मेधा कुलकर्णी यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली आहे. (Grateful for the party giving me an opportunity to work again Medha Kulkarni)

हेही वाचा – Swine Flu : ‘स्वाइन फ्लू’ पुन्हा परतला अन् बळीही घेतले; ‘या’ जिल्ह्यात नागरिकांची चिंता वाढली

- Advertisement -

मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, खूप आनंद, खूप समाधान, छान वाटतंय पक्षाने मला ही संधी दिली. पक्षाने माझ्यावर हा जो विश्वास दाखवला आणि पुन्हा एकदा काम करण्याची संधी त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. पुण्यामध्ये अनेक वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं. तीन टर्म नगरसेवक आणि एक टर्म आमदार म्हणून काम केल्यानंतर आता राज्यसभेवर खासदार म्हणून काम करताना एक वेगळा अनुभव मला मिळेल. राष्ट्रीय पातळीवर महिला मोर्चाची उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यामुळे काही प्रमाणात दिल्लीला आणि देशभर जाणं झालं आहे. आताही दिल्लीच्या सभागृहामध्ये जाण्याची संधी मिळाली आहे. तिथे मी पुण्याचे प्रश्न मांडू शकेल आणि पक्षाच्या माध्यमातून ज्या-ज्या जबाबदाऱ्या दिल्या जातील त्या पार पाडण्याचा प्रयत्न करेन, असे मेधा कुलकर्णी म्हणाल्या.

सातत्याने बोललं जात होतं की, पक्षाकडून तुमच्यावर अन्याय होत आहे, तो अन्याय आज दूर झाला असं वाटतं का? या प्रश्नावर मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, आज इतका आनंदाचा दिवस आहे, त्यामुळे बाकी काही गोष्टी बोलण्याची मला आवश्यकता वाटत नाही. सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहित आहेत आणि माहित आहे म्हणूनच हा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे आता छान घडलेलं असताना काही वेगळं आठवण्याची आवश्यकता मला वाटतं नाही. एकत्र येऊन छान काम करू. पुण्याचा विकास असेल, पक्ष विस्तार असेल किंवा अन्य काही जबाबदाऱ्या पक्ष सांगेन त्यापद्धतीने मी काम करेन.

- Advertisement -

हेही वाचा  – BJP : ‘देशभक्ती’, ‘हौतात्म्य’ शब्दांना बदनाम करू नये, ठाकरे गटाने भाजपाला सुनावले

छान घडलेल्या गोष्टींवर आपण बोलू

राज्यसभा मिळेल असं तुम्हाला वाटलं होतं का? या प्रश्नावर मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, काही गोष्टी या पक्षातंर्गत असतात. सगळ्या गोष्टी प्रसिद्धीच्या नसतात. त्यामुळे छान घडलेल्या गोष्टींवर आपण बोलू, पुणे काय करता येईल याबद्दल बोलू, असं मेधा कुलकर्णी म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -