घरदेश-विदेशगर्दीतूनही आता शोधता येणार कोरोना रुग्ण; IIT च्या माजी विद्यार्थ्यांची कमाल

गर्दीतूनही आता शोधता येणार कोरोना रुग्ण; IIT च्या माजी विद्यार्थ्यांची कमाल

Subscribe

IIT च्या माजी विद्यार्थ्यांचे ड्रोन यशस्वी

जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. लॉकडाऊनच्या नियमात काहीशी शिथिलता आणत पुन्हा लॉकडाऊननंतर देश हळूहळू अनलॉक होऊ लागला आहे. असे असले तरी कोरोनाचा धोका संपला असे पुर्णतः म्हणता येणार नाही. अनेक दिवसांपासून घरात अडकून असलेली लोक अनेक ठिकाणी गर्दी करताना दिसताय.

कोरोना व्हायरसशी लक्षणं अनेकांमध्ये दिसत नसल्याने सार्वजनिक ठिकाणांसह गर्दी होणाऱ्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढू शकते, अनेक रुग्णांमध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसत नसल्याने आता अशा परिस्थिती कोरोनाव्हायरसवर नियंत्रण ठेवणे हे एक आव्हानच आहे. मात्र यावर मार्ग शोधत आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांनी विशेष ड्रोन तयार केला आहे, जो गर्दीतही कोरोना रुग्णाला शोधून काढेल.

- Advertisement -

असा आहे कोरोना रुग्णाला शोधणारा ड्रोन

  • हैदराबादमधील आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांनी इंफ्रारेड कॅमेरा असलेला ड्रोन तयार केला आहे. हा ड्रोन गर्दीच्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या तापमानाची तपासणी करू शकेल.
  • या ड्रोनमध्ये एक लाऊडस्पीकरही लावण्यात आला असून ज्याच्या शरीराचं तापमान जास्त असेल त्याला गर्दीतून शोधण्याचे काम हा ड्रोन करतो.
  • लाऊडस्पीकच्या मदतीने त्या व्यक्तीला थांबवण्याची किंवा गर्दीतून बाजूला होण्याची सूचना देता येते.

IIT च्या माजी विद्यार्थ्यांचे ड्रोन यशस्वी

मिळालेल्या माहितीनुसार, थर्मल स्क्रिनिंगसाठी एअरबोर्न इन्फ्रारेड कॅमेऱ्याची विविध प्रकारे चाचणी घेण्यात आली असून ती यशस्वी झाली आहे. या ड्रोनमार्फत होणाऱ्या थर्मल स्क्रिनिंगचा फायदा म्हणजे एका-एका व्यक्तीची तपासणी करण्याची गरज नाही. गर्दीतही ताप असलेल्या व्यक्तीला ओळखून त्याची कोरोना टेस्ट करता येऊ शकते, असे मारुत ड्रोनच्या सीईओंनी सांगितले.

यासह कंपनीने असाही दावा केला की, अनलॉकच्या कालावधीतही कोविड-19 वर नियंत्रण ठेवण्यात एयरबोर्न थर्मल स्क्रिंनिंगची मदत होणार असून लॉकडाऊनमध्ये हैदराबाद आणि करीमनगर पोलिसांनी या ड्रोनचा वापर केला असल्याचे ही सांगण्यात आले आहे.


शताब्दी रुग्णालयातून बेपत्ता कोरोनाग्रस्ताचा बोरिवली स्थानकावर सापडला मृतदेह!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -