घरदेश-विदेशहैद्राबाद बॉम्बस्फोट प्रकरण; दोन आरोपींना फाशी तर एकाला जन्मठेप

हैद्राबाद बॉम्बस्फोट प्रकरण; दोन आरोपींना फाशी तर एकाला जन्मठेप

Subscribe

हैद्राबाद येथे २००७ साली झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल तब्बल ११ वर्षानंतर लागला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना फाशीची शिक्षा तर एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हैद्राबादमधील दुहेरी बॉम्बस्फोट प्रकरणी दोन दहशतवाद्यांना फाशीची तर एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हैद्राबाद येथील एनआईएच्या विशेष न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. हैद्राबात शहरात २५ ऑगस्ट २००७ गोकुळ चाट आणि लुम्बिनी पार्क येथील एका ओपन एअर थिएटरमध्ये बॉम्बस्फोट केला होता. या स्फोटामध्ये ४४ जणांचा मृत्यू झाला होता तर ६८ जण जखमी झाले होते. अनीफ सैय्द आणि मोहम्मद अकबर इस्लाईम चौधरी या दोन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावणयात आली आहे. तर तिसरा आरोपी तारिक अंजुमला याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

११ वर्ष जुन्या प्रकरणाचा निकाल लागला

अकरा वर्ष जुने असलेल्या या प्रकरणात ४ सप्टेंबरला अनीफ सैय्द आणि मोहम्मद अकबर इस्लाईम चौधरी या दोन आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले होते. तर सबळ पुराव्या अभावी फारुख शरफुद्दीन तर्कश आणि मोहम्मद सादिक इसरार अहमद शेख याची निर्दोष सुटका करण्यात आली होती. एनआईएच्या विशेष न्यायालयात सोमवारी झालेल्या सुनावणी दरम्यान अनीफ सैय्द आणि मोहम्मद अकबर इस्लाईम चौधरी यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर कोर्टाने याप्रकरणात तारिक अंजुमला या पाचव्या आरोपीला दोषी ठरवत त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

तीन ठिकाणी करायचे होते बॉम्बस्फोट

एनआईएच्या स्पेशल पब्लिक प्रोसेक्यूटर सुरेंद्र यांनी सांगितले की, न्यायालयाने दोन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. गोकुळ चाट और लुंबिनी पार्कमध्ये बॉम्बस्फोट करण्यात आला होता. तर दिलसुखनगर येथे तिसरा बॉम्ब आरापींनी ठेवला होता मात्र त्याचा स्फोट झाला नाही. या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड रियाज भटकल आणि इकबाल भटकल यांना आपल्या घरामध्ये राहण्यासाठी मदत करणाऱ्या तारीक अंजुमनला कोर्टाने दोषी ठरवत त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -