घरदेश-विदेशया कारणामुळे चालकाने ट्रेन पुढे नेली

या कारणामुळे चालकाने ट्रेन पुढे नेली

Subscribe

DMU रेल्वे चालकाचा लेखी जावाब प्राप्त झाला आहे. त्यामध्ये दुर्घटनेचे कारण लिहून दिले आहे.

अमृतसर येथील चौडा बाजारात रावण दहन पाहण्यासाठी रेल्वे रुळावर उभ्या असलेल्या लोकांना रेल्वेने धडक दिल्यामुळे मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत ६१ जणांचा मृत्यू तर ७२ नागरिक जखमी झाले होते. या घटनेसंबधी रेल्वे चालकाने लेखी जाब लिहून दिला आहे. अरविंद कुमार असे याचालकाचे नाव असून त्याने आपन निर्दोष असल्याचे पत्रात लिहिले आहे. मात्र अपघातात मृत्यू झालेल्या लोकांच्या मृत्यूला जवाबदार नक्की जवाबदार कोण यावर प्रश्चचिन्ह उपस्थीत करण्यात आले.

 

- Advertisement -

काय लिहिले आहे या पत्रात

संबधीत स्थानकावरुन हिरवा आणि पिवळा सिग्नल मिळाल्यामुळे रेल्वेला मी पुढे नेले. लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी मला दिसली त्यावेळी मी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडी वेगात असल्याने मला जागेवर थांबवता आली नाही. लोकांची गर्दी मला दिसताच मी हॉर्न वाजवला होता. मात्र लोकांनी गाडीवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मी रेल्वे पुढच्या स्थानकावर घेऊन गेलो. या घटनेबद्दल तत्काळ मी रेल्वे अधिकाऱ्यांनाही माहिती दिली होती. असे कुमार याने लिहिलेल्या पत्रात सांगितले आहे.

- Advertisement -

फाटकावरील कर्मचाऱ्यांची चूक

रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितले की, रेल्वे जेव्हा अमृतसरच्या रेल्वे फाटकाजवळ पोहोचली, तेव्हा फाटकावर उभ्या असलेल्या कर्मचाऱ्याने नीट लक्ष ठेवायला हवे होते. त्यामुळे या दूर्घटनेत लाइनमनचा दोष असू शकतो. शेकडो नागरिक रुळावर थांबले होते. तरीही त्याने यासंदर्भातील माहिती मोटरमन किंवा त्यांच्या कार्यालयाला दिली नाही. रावण दहनाचा कार्यक्रम सुरू झाला होता. फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. त्यामुळे लोकांनादेखील ट्रेनचा आवाज आलाच नाही.

आयोजकही दोषी

या दूर्घटनेसंदर्भात रेल्वे प्रशासनाला जाब विचारला असता, प्रशासनाने सांगितले की, रेल्वे फाटकाशेजारी आयोजित रावण दहनाच्या कार्यक्रमाबाबत आपल्याला काहीच माहिती देण्यात आली नव्हती. तर दुसरीकडे, पंजाब आणि दिल्लीतील रेल्वे विभागांनी रेल्वे ट्रॅकजवळ रावण दहनाचा कार्यक्रम होत असल्याची आपल्याला कल्पनाही नव्हती असे बोलून हात झटकले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -