घरदेश-विदेश''आज बाबासाहेब आंबेडकर असते, तर भाजपात असते''

”आज बाबासाहेब आंबेडकर असते, तर भाजपात असते”

Subscribe

'भाजप ज्याप्रमाणात दलित समासाठी काम करत आहे, तितकं काम आजवर कोणत्याही सरकारने केलं नव्हतं' असा दावा लालजी प्रसाद निर्मल यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशमधील प्रशासकीय अधिकारी लालजी प्रसाद निर्मल यांनी बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या एका विधानाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.  ‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज जिवंत असते तर ते भाजपात असते’, असं विधान निर्मल यांनी केलं आहे. केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारने दलित समाजासाठी सुरु केलेल्या विविध योजनांचा दाखला देताना त्यांनी हे मत मांडलं आहे. लालजी प्रसाद निर्मल हे  उत्तर प्रदेश अनुसूचित जाती वित्त विभागाचे प्रमुख आहेत. शुक्रवारी झालेल्या एका कार्यक्रमात निर्मल म्हणाले, की ‘केंद्र व राज्यातील भाजप सरकारने दलितांसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. भाजप ज्याप्रमाणात दलित समासाठी काम करत आहे, तितकं काम आजवर कोणत्याही सरकारने केलं नव्हतं. चालू आर्थिक वर्षात केंद्रातील सरकारने दलित समाजासाठीच्या योजनांसाठी १३८ कोटी रुपये दिले आहेत’, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

‘आज जर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असते तर ते नक्की भाजपात असते’, असं मत निर्मल यांनी यावेळी व्यक्त केलं. विद्यमान सत्ताधाऱ्यांचे काम पाहून आंबेडकरांनी त्यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला असता, असा त्यांच्या एकंदर वक्तव्याचा सूर होता. यावेळी बोलताना, उत्तर प्रदेशमधील अनुसूचित जाती वित्त आणि विकास विभागाने १२ हजार २८० कुटुंबांना १४. २७ कोटी रुपयांची मदत केली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

- Advertisement -

मोदी, योगी दलितांचे राम

यापूर्वी निर्मल यांनी ‘पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ हे दलितांचे राम आहेत’, असं वक्तव्य केलं होतं. इतकंच नाही तर एप्रिल महिन्यात त्यांनी योगी यांनी आंबेडकर महासभातर्फे दिला जाणारा ‘दलित मित्र’ हा पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. दरम्यान या पुरस्कार सोहळ्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी, आंबेडकर महासभेचे प्रमुख असलेल्या निर्मल यांच्याकडे उत्तर प्रदेश अनुसूचित जाती वित्त आणि विकास मंडळाच्या प्रमुखपद सोपवले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -