घरदेश-विदेश...तर चीनशी युद्ध अटळ - फिलिपाईन्स

…तर चीनशी युद्ध अटळ – फिलिपाईन्स

Subscribe

आगामी काळात चीन आणि फिलीपाईन्समध्ये मोठा वाद होण्याची शक्यता आहे. चीनने रेड लाईन पार केल्यास आणि दक्षिण दक्षिण चीन समुद्रात नैसर्गिक साधनसंपत्तीवर दावा केल्यास युद्ध अटळ असल्याचे फिलीपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो डुपेर्टे यांनी म्हटले आहे.

चीनशी युद्ध शक्य?

- Advertisement -

दरम्यान, दक्षिण चीन समुद्रातल्या आपल्या हक्कांच्या रक्षणासाठी फिलीपाईन्स युद्ध करेल असे फिलीपाइन्सचे परराष्ट्र सचिव अॅलन पीटर कॅटॅटोनो यांनी म्हटले आहे. चीन २०१६मध्ये आंतरराष्ट्रीय लवादाने दिलेल्या निर्णयाकडे दुर्लक्ष करत आहे. शिवाय, दक्षिण चीन समुद्रात दावा करण्याचा कोणताही कायदेशीर हक्क चीनकडे नसल्याचे परराष्ट्र सचिव कॅटॅटोनो यांनी म्हटले आहे. चीनने नैसर्गिक साधन संपत्तीवर हक्क सांगण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी आम्ही त्याला जुमानणार नसल्याचे देखील यावेळी फिलीपाईन्सने स्पष्ट केले.

“हक्काच्या रक्षणासाठी आम्ही सक्षम”

- Advertisement -

आपल्या हक्काच्या जागेचे आणि साधनसंपत्तीचे रक्षण करण्यासाठी फिलीपाईन्स सक्षम आहे. आत्तापर्यंत चीनच्या बाबतीत सामंजस्याची भूमिका घेण्यात आली. पण, चीनने मात्र त्याकडे डोळेझाक केल्याचे फिलीपाईन्सने म्हटले आहे. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर रॉड्रिगो डुपेर्टे यांनी चीनविरोधात नेहमीच सामंजस्याची भूमिका घेतली आहे. अनेक वेळा राष्ट्राध्यक्षांनी चीनशी उघडपणे संघर्ष हा देशाच्या हिताचा नसून तो आत्मघातकीपणा ठरेल, असेही स्पष्ट केले आहे.

दोन्ही देशांमध्ये सामंजस्य महत्त्वाचे

चीन आणि फिलीपाईन्स या शेजारी राष्ट्रांनी सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी. शिवाय ‘मैत्रीचा समतोल देखील राखला पाहिजे’, असे चीनच्या परराष्ट्र खात्याने स्पष्ट केले आहे. मागील महिन्यात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि फिलीपाईन्सचे परराष्ट्र सचिव कॅटॅटोनो यांची भेट झाली. त्यावेळी दोन्ही देशांनी सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी यावर एकमत झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -