घरमनोरंजनकाजोल आता हॉलिवूडही गाजवणार

काजोल आता हॉलिवूडही गाजवणार

Subscribe

भारतात सध्या हॉलिवूड चित्रपटांची मोठी क्रेझ सुरू आहे. त्यातही, अॅनिमेशन चित्रपटांची लोकप्रियता वाढली आहे. त्यात आता हॉलिवूडमधील चित्रपट निर्मात्यांनी अॅनिमेशन पटांकडे अधिकाधिक भारतीय प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी भारतीय कलाकारांची मदत घ्यायला सुरूवात केली आहे. हॉलिवुड अॅनिमेशन चित्रपटांच्या डबिंगसाठी भारतीय कलाकारांचे आवाज दिले जात आहेत.

भारतीय कलाकारांनी डबिंग करण्यात ‘डेडपूल २’ हा पहिला प्रयोग होता. यामध्ये बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याने हिंदीत डबिंग केले होते. आता हॉलिवूडच्या ‘इन्क्रेडिबल २’ या अॅनिमेशन पटासाठी बॉलिवूडची अभिनेत्री काजोल डबिंग करणार आहे.

- Advertisement -

काय आहे ‘इन्क्रेडिबल २’?

‘इन्क्रेडिबल २’ हा एक लहान मुलांच्या आवडीचा आणि आकर्षण असणारा अॅनिमेशन पट आहे. २००४ मध्ये आलेल्या ‘इन्क्रेडिबल’ या अॅनिमेशन पटाचा पुढचा भाग यात दाखवला जाणार आहे. ‘इन्क्रेडिबल २’ या अॅनिमेशन पटामध्ये काजोल हॅलन पर उर्फ इलॅस्टिक गर्ल या पात्रासाठी हिंदीत आपला आवाज देणार आहे. आयएएनएस या वृतसंस्थेशी बोलताना काजोल म्हणाली, “‘इन्क्रेडिबल २’ ची कथा आपल्यासारखीच एक हृदयस्पर्शी कथा आहे. परंतु, या कथेतील पात्र वेगळी आहेत. या कथेतील बरेच क्षण माझ्या हृदयाला स्पर्श करुन गेले.”

काजोलचा आवाज नव्या प्रेक्षकांना आकर्षित करेल

डिझने स्टुडिओ एंटरटेनमेंटचे प्रमुख अधिकारी बिक्रम दंगल यांनी सांगितले की, “डिझनेने खूप सुंदर पात्र आणि अद्भुत कथा बनवल्या आहेत. पिक्सर नेहमीच योग्य दर्जाचे चित्रपट करुन लाखो भारतीयांचे मन जिंकतो. आताही काजोलने ‘इन्क्रेडिबल २’ साठी केलेले काम नव्या प्रेक्षकांना आकर्षित करेल याची खात्री आहे.”

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -