घरCORONA UPDATEअमित शहांशी डॉक्टरांचा संवाद, आयएमएनं केलं निषेध आंदोलन रद्द!

अमित शहांशी डॉक्टरांचा संवाद, आयएमएनं केलं निषेध आंदोलन रद्द!

Subscribe

कोरोनाशी लढा देणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांचा निषेध करण्यासाठी देशभरातील आयएमए अर्थात इंडियन मेडिकल असोसिएशनशी संलग्न डॉक्टरांनी आज रात्री ९ वाजता मेणबत्त्या लावून निषेध करण्याचे जाहीर केले होते. तसेच, उद्या देशभरात या हल्ल्यांचा निषेध केला जाणार होता. मात्र, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत आयएमएच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये आयएमएच्या डॉक्टरांचं समाधान झालं असून त्यांनी आज रात्री करणार असलेला निषेध रद्द केला आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार आवश्यक ती सर्व पावलं उचलेल आणि योग्य असा कायदा लवकरच आणेल, असं आश्वासन अमित शहांनी आयएमएला दिल्यानंतर हे निषेध आंदोलन रद्द करण्यात आलं.

डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी आणि या हल्ल्यांना रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी करण्यासाठी देशभरातल्या डॉक्टरांची शिखर संघटना असलेल्या आयएमएने आज रात्री निषेध आंदोलनाचा इशारा दिला होता. २२ एप्रिल रोजी सर्व डॉक्टरांनी पांढरा कोट घालून मेणबत्त्या पेटवून निषेध करण्याचा निर्णय घेतला होता. शिवाय गुरुवारी देशभरातील डॉक्टरांनी काळा दिवस पाळण्याचा इशारा दिला होता. डॉक्टरांवर अनेक ठिकाणी हल्ल्याच्या घटना याआधीही घडल्या होत्या. मात्र, कोरोनाच्या संकटात देखील हल्ल्याच्या घटना घडतच आहेत. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी निषेध करण्याचा निर्णय घेतला होता.

- Advertisement -

आज सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयएमएच्या महत्त्वाच्या व्यक्तींसोबत चर्चा केली. यावेळी आरोग्यमंत्री हर्षवर्धन, आरोग्य विभाग सचिव प्रीती सुदान आणि इतर महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी आयएमएच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टरांची भूमिका ठामपणे मांडली. यावेळी डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी सरकार आवश्यक ती सर्व पावलं उचलेल आणि त्यासंदर्भात कठोर कायदा आणू असं आश्वासन अमित शहांनी आयएमएला दिलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -