घरताज्या घडामोडीCoronaVirus: सलमानच्या वडिलांवर लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याचा आरोप

CoronaVirus: सलमानच्या वडिलांवर लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याचा आरोप

Subscribe

देश कोरोना व्हायरसच्या संकटाशी सामना करत आहे. लोकांमध्ये सोशल डिस्टन्सिंग असावी म्हणून देशभरात लॉकडाऊन जारी करण्यात आला. २१ दिवसांनंतर लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्यात आला. दरम्यान बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या भाचा निर्वाना याच्यासोबत पनवेलच्या फार्म हाऊसवर आहे. तर सलमान खानचे वडील त्याच्या वांद्र्यातील घरी आहेत. त्यामुळे सलमानला वडिलांसोबत भेटून अनेक आठवडे झाले आहेत. अशा परिस्थितीत सलमाने नुकतीच वडिलांच्या प्रकृती विषयी चिंता व्यक्त केली होती. याच दरम्यान सलमान खानचे वडील लॉकडाऊनचे उल्लंघन करून मॉर्निंग वॉकला जात असल्याचं समोर आलं आहे. वांद्र्यातील एक व्यक्तीने असा आरोप केला आहे की, सलमानचे वडील सलीम खान दररोज सकाळी अर्धा तास फिरण्यासाठी जात असतात. मात्र सलीम खान यांनी या आरोप प्रत्युत्तर देत, आपल्याला पाठीची समस्या असल्याचं स्पष्ट केलं आहे.

पिंकविलाच्या वृत्तानुसार, वांद्र्याच्या एका व्यक्तीने सलीम खान आपल्या मित्रांसोबत मॉर्निंग वॉकला जात असल्याचा आरोप केला आहे. त्या व्यक्तीने सांगितलं की, गेल्या तीन आठवड्यांपासून आम्ही त्यांना बाहेर फिरत असताना पाहत आहोत. ते सकाळी ८.३० वाजता येतात आणि ९ वाजेपर्यंत असतात. लॉकडाऊन दरम्यान सर्वसामान्यांना गरज नसताना बाहेर पडण्यावर बंदी आहे. पण मग सेलिब्रिटी आणि त्यांच्या कुटुंबाला वेगळे नियम असतात का?

- Advertisement -

माध्यमांनी याबाबत सलीम खान यांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं की, मला पाठीचा त्रास आहे आणि डॉक्टरांनी मला चालण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, गेल्या ४० वर्षांपासून ते फिरायला जातात. मात्र अचानक हे थांबल्यामुळे त्रास होऊ लागला. सरकारकडून पास घेतलेला असून कोणताही लॉकडाऊनचा नियम तोडला नाही आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.


हेही वाचा – Photo : ‘असा’ शूट झाला ‘महाभारता’तील द्रोपदी वस्त्र हरणाचा सीन

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -