घरताज्या घडामोडीदारणा सांगवीत बिबट्या जेरबंद

दारणा सांगवीत बिबट्या जेरबंद

Subscribe

हिंगणवेढे येथे दोन दिवसापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांच्या मागणीनुसार वन विभागाने दारणा सांगवी परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी पहाटे 5 वर्षाचा नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला. वन विभागाचे कर्मचारी जेरबंद केलेल्या बिबट्याला निफाड येथील वन विभागाच्या रोपवाटिका केंद्रात घेवून आले.

हिंगणवेढे परिसरात बिबट्याने मुलावर हल्ला केल्याची घटना ताजी असताना ग्रामस्थांना मंगळवारी पुन्हा दोन बिबटे दिसल्याने दहशत निर्माण झाली आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार वन विभागाने 19 एप्रिल रोजी दारणा सांगवी येथील दगू खंडू करपे यांच्या शेतात पिंजरा लावला होता. बुधवारी पहाटे पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकल्याचा दिसताच ग्रामस्थांनी वन विभागाशी संपर्क साधला. त्यानुसार वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी बिबट्याला पाहण्यासााठी बघ्यांची गर्दी झाली होती. ते पिंजऱ्यासह बिबट्याला निफाडला घेवून गेले. बिबट्याचे निरीक्षण केले असता त्याच्या पोटाजवळ जखम झाल्याचे दिसून आले. पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यानंतर त्यास त्याच्या अधिवासात सोडले जाणार आहे. उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, सुजित नेवसे यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. दारणा सांगवी भागात बिबट्यांचा वावर असल्याने आणखी दोन पिंजरे लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -