घरदेश-विदेशछत्रपती संभाजीनगर राड्याप्रकरणी जलील यांचं थेट पंतप्रधानांना पत्र; केले हे गंभीर आरोप

छत्रपती संभाजीनगर राड्याप्रकरणी जलील यांचं थेट पंतप्रधानांना पत्र; केले हे गंभीर आरोप

Subscribe

उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी जलील यांनी पत्राद्वारे केली आहे.

छत्रपती संभाजीनगर राड्याप्रकरणी खासदार इम्तियाज जलील यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. हे पत्र लिहित त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे रामनवमीच्या पूर्वसंध्येला राडा झाला होता. आता याच संदर्भात अनेक आरोप करणारे पत्र जलील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.

रामनवमीच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र किराडपुरा भागात राडा झाला. यात करण्यात आलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला.imtiyaz jaleel’s direct letter to the Prime Minister Narendra Modi in the case of Chhatrapati Sambhajinagar Rada

- Advertisement -

मी स्वत: तिथे उपस्थित – जलील

जलील यांनी पत्रात लिहिले की, मी स्वत: 2 तासांहून अधिक काळ मंदिरात उपस्थित होतो आणि केवळ 15 पोलीस यावेळी होते. ज्यांना केवळ मंदिराचे रक्षण करणाऱ्यापासूनच नव्हे तर दगडफेक करणाऱ्या आणि वाहनांची जाळपोळ करणाऱ्या 100 हून अधिक लोकांच्या गर्दीला सामोरे जायचे होते. यात 13 वाहने जळाली असून त्यातील बहुतांश मोठमोठ्या पोलीस व्हॅन्स होत्या,असे जलील यांनी पत्रात म्हटले आहे.

त्या रात्री घडलेल्या सर्व घडामोडींचा मी साक्षीदार आहे. कारण, वारंवार बेशिस्त गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केल्यावर मी राममंदिराच्या पावित्र्याचे रक्षण करण्यासाठी स्वत: उभा होतो, असे जलील यांनी पत्रात लिहिले आहे.

- Advertisement -

जेव्हा 13 गाड्या जाळण्यात आल्या तेव्हा पोलीस कुठे होते? समाजकंटकांना हिंसाचार करण्यासाठी असं मोकळं का सोडण्यात आलं. जेव्हा हा राडा झाला तेव्हाचे सीसीटीव्ही फुटेज कुठे आहेत? अग्नीशमन दलाच्या गाड्यांना का थांबवण्यात आले? तसेच, ज्या ठिकाणी वाहने जाळली जात होती त्याठिकाणी जाण्यास पोलिसांना का परवानगी दिली नाही? असे अनेक प्रश्न त्यांनी या पत्राद्वारे उपस्थित केले आहेत.

( हेही वाचा: Code Word ने खळबळ: केजरीवालांनी मागवलेल्या १५ किलो तूपाचा सुकेशने केला खुलासा; म्हणाला, ते ‘तूप’ म्हणजे… )

राड्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी

या राड्यामागे नेमका कोणाचा हात आहे. हे षड्‍यंत्र कोणी घडवून आणले. कोणाच्या सांगण्यावरुन हे नियोजित आणि अंमलात आणले गेले, याची सखोल चौकशी व्हावी. त्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी जलील यांनी पत्राद्वारे केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -