घरताज्या घडामोडीIT Recruitment 2022: सरकारी नोकरी शोधताय, तर आयकर विभागाने आणली सुवर्णसंधी, जाणून...

IT Recruitment 2022: सरकारी नोकरी शोधताय, तर आयकर विभागाने आणली सुवर्णसंधी, जाणून घ्या

Subscribe

सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. आयकर विभागाने सरकारी नोकरीसाठी सुवर्णसंधी आणली आहे. भारत सरकारच्या आयकर विभागाने पश्चिम बंगाल आणि सिक्किमच्या प्रधान मुख्य आयकर आयुक्त कार्यालयात विविध पदांवरील भरतीसाठी जाहिरात जाहीर केली आहे. विभागाद्वाने जारी केलेल्या जाहिरातीनुसार कर निरीक्षक, कर सहाय्यक आणि मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस)च्या एकूण २४ पदांवरील भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यामुळे या सरकारी नोकरीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांचे अर्ज ऑफलाईनमाध्यमातून १८ एप्रिल २०२२ पर्यंत जमा करू शकतात.

उमेदवारांची पात्रता

आयकर विभागाकडून जारी करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार, आयकर निरीक्षक पदासाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापिठातील पदवी आणि कोणतीही समकक्ष पात्रता उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवाराचे वय १८ एप्रिल २०२२ रोजी १८ ते ३० वर्ष असले पाहिजे.

- Advertisement -

कर सहाय्यक पदासाठी उमेदवारांकडे ग्रॅज्युएशन पदवीसोबत ८००० केडीपीएच वेगाने डेटा एंट्री करण्यास सक्षम पाहिजे. वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे असावी.

मल्टी टास्किंग स्टाफसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा कौन्सिलमधून मॅट्रिक उत्तीर्ण, समकक्ष पात्रता असावी. वय १८ ते २५ वर्षादरम्यान असले पाहिजे. याव्यतिरिक्त सर्व पदांसाठी उमेदवारांनी विभागाद्वारे निर्धारित क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतलेला असावा.

- Advertisement -

निवड प्रक्रिया

जाहिरातीनुसार, सर्व पदांसाठी आलेल्या अर्जांची पडताळणी झाल्यानंतर निवड केलेल्या उमेदवारांना त्यांच्या संबंधित खेळातील प्राविण्य पाहण्यासाठी ग्राऊंड चाचणीसाठी बोलावले जाईल. कर सहाय्यक पदासाठी उमदेवारांची डेटा एंट्रीच्या स्किलची चाचणी केली जाईल.


हेही वाचा – राकेश झुनझुनवालांच्या पोर्टफोलियोमधील मोठा शेअर 30 टक्क्यांनी पडला, गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -