घरताज्या घडामोडीJhund : ...अन् त्यानंतर अमिताभ बच्चन झुंडमध्ये काम करण्यास तयार झाले, वाचा...

Jhund : …अन् त्यानंतर अमिताभ बच्चन झुंडमध्ये काम करण्यास तयार झाले, वाचा काय म्हणाले बिग बी?

Subscribe

नागराजने झुंड सिनेमासाठी बिग बी अमिताभ बच्चन यांची निवड केली. मात्र नागराज सोबत झुंड सिनेमा करण्यासाठी पहिल्यांदा अमिताभ बच्चन तयार नव्हते हेही तितकेच खरे आहे. जो आमिर खान झुंड, नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चन यांचे कौतुक करत आहे खरंतर त्याच आमिर खानमुळे आज झुंड सिनेमा अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत.

Jhund : नागराज मंजुळे (Nagraj Manjule ) दिग्दर्शित आणि सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan ) अभिनीत झुंड (Jhund) या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. मराठमोळ्या नागराज मंजुळे यांनी झुंडच्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे. केवळ प्रेक्षकच नाही सिनेसृष्टीत कलाकारही झुंड आणि नागराजच्या प्रेमात पडले आहेत. बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानने देखील सिनेमाचे कौतुक करत अमिताभ बच्चन यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक उत्तम सिनेमे केले पण हा त्यांच्या सर्वोत्कृष्ट कलाकृतींपैकी एक आहे; त्यांच्या महान सिनेमांपैकी एक आहे, असे म्हटले.

नागराजने झुंड सिनेमासाठी बिग बी अमिताभ बच्चन यांची निवड केली. मात्र नागराज सोबत झुंड सिनेमा करण्यासाठी पहिल्यांदा अमिताभ बच्चन तयार नव्हते हेही तितकेच खरे आहे. जो आमिर खान झुंड, नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चन यांचे कौतुक करत आहे खरंतर त्याच आमिर खानमुळे आज झुंड सिनेमा अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. ‘झुंड’ या सिनेमाची शिफारस आमिरनेच बिग बींकडे केली होती आणि त्यांना त्यासाठी तयार देखील केले होते. सुरुवातील बिग बींनी झुंड हा सिनेमा करण्यास नकार दिला होता मात्र अभिनेता आमिर खानच्या शिफारसीनंतर बिग बी सिनेमात काम करण्यासाठी तयार झाले. स्वत: बिग बींनीच याचा खुलासा केला आहे.

- Advertisement -

Jhund : आम्ही २०-३० वर्षात जे शिकलो त्याचा नागराजने फुटबॉल बनवला, झुंड पाहिल्यानंतर आमिरची पहिली रिअँक्शन

बिग बी म्हणाले, ‘मला आठवते जेव्हा मी आमिरशी याविषयी चर्चा केली होती; त्याने मला मी हा सिनेमा करायलाच हवा असे सांगितले. आणि जेव्हा आमिर एखाद्या गोष्टीची शिफारस करतो तेव्हा काय होते हे तुम्हाला माहिती आहे.’

- Advertisement -

झुंड सिनेमा फ्लोअरवर जाण्यापूर्वी, आमिरने सिनेमाची स्क्रिप्ट ऐकली आणि त्याने तो इतका प्रभावित झाला की त्याने अमिताभ  बच्चन यांना सिनेमा करण्याची शिफारस केली आणि ते त्यासाठी कसे योग्य आहेत हे पटवूनही दिले. अमिताभ हे झुंडसाठी एक परिपूर्ण निवड आहेत, याची आमिरला खात्री होती.

 

आमिर झुंडच्या एका स्पेशल स्क्रिनिंगनंतर भावनिक होत त्याला अश्रू अनावर झाले.  सिनेमाचे कौतुक करताना त्याने नमूद केले होते, ‘हा एक उत्कृष्ट सिनेमा आहे. हे अविश्वसनीय आणि खूप अनोखे आहे आणि ते कसे घडले ते मला कळत नाही. मी भारावून गेलो आहे आणि हा सिनेमा मला बाहेर पडू देत नाहीए. माझ्याकडे शब्द नाहीत कारण हा एक अतिशय आश्चर्यकारक सिनेमा आहे’, असे आमिरने म्हटले.


हेही वाचा – Virat Kohli 100th Test : विराटच्या १००व्या टेस्टसाठी अनुष्का पोहोचली मैदानात, नेटिझन्सनी केलं ट्रोल

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -