घरताज्या घडामोडीआता बापाला विसरणारे देशात अनेक जण झालेत, खडसेंची महाजनांवर जहरी टीका

आता बापाला विसरणारे देशात अनेक जण झालेत, खडसेंची महाजनांवर जहरी टीका

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात वाकयुद्ध सुरू आहे. या आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्यांमध्येच आता एका मुलाखतीत गिरीश महाजन यांनी कोण एकनाथ खडसे असा सवाल केला ? या वक्तव्यावरूनच एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांवर जहरी टीका केली आहे. गिरीश महाजनांना राजकारणातील आठवण करून देताना खडसे म्हणाले की, गिरीश महाजन यांना राजकारणात मी आणल अन् घडवलही. हे सगळ जगाला माहित आहे. पण बापाला विसरणारे अनेक लोक आता जन्माला आले आहेत. या वक्तव्यामुळे आता खडसे महाजन आरोप प्रत्यारोपारोपाचा नवा अंक सुरू झाला आहे. (Eknath khadse slams bjp girish mahajan for fogetting entering into politics and gave mla ticket)

गिरीश महाजन आता भाजपचे राष्ट्रीय नेते झाले आहेत. त्यांच्यासाठी मी आता लहान कार्यकर्ता आहे. पण असे असले तरीही राजकारणात गिरीश महाजन यांना मी जन्माला घातले आहे. त्याना राजकारणात टिकवल आहे. तिकीट मिळवून देण्यापासून ते जिंकून देण्यातही गिरीश महाजनांना मदत केली आहे. त्यामुळे आताच्या काळात बापाला विसरणाऱ्यांची संख्या कमी नाही. सगळ्या जगाला माहित आहे की त्यांना राजकारणात कोणी आणलं, वाढवलं. आता परिस्थिती मात्र बदलली आहे. गिरीश महाजन हे स्वतःच्या बळावर भाजपला निवडून आणतील अशी शक्यता राहिलेली नाही. आगामी काळातील निवडणुकांमध्ये कोण किती पाण्यात आहे हे नक्कीच दिसून येईल असेही विधान खडसेंनी केले.

- Advertisement -

जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजपला पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे गिरीश महाजन आत्ताच्या घडीला आत्मविश्वास गमावलेले नेते आहेत. अशा आत्मविश्वास गमावलेल्या नेत्यांच्या जिवावर भाजप निवडून येईल, अशी परिस्थिती सध्या दिसत नाही. त्यामुळे आगामी काळातील निवडणुकांमध्ये सगळ्याच गोष्टी स्पष्ट होतील असेही खडसे म्हणाले.जळगावमध्ये भाजप भुईसपाट होत चालली आहे. गिरीश महाजनांनी बैठकांचे सत्र सुरू केले आहे. सर्व निवडणुका या स्वबळावर लढायचे भाजपने ठरवले आहे. कार्यकर्त्यांनाही तशा सूचना देण्यात आल्या आहेत. आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीची झलक आहे, अशा शब्दात त्यांनी खडसेंवर हल्लाबोल केला आहे.

 

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -