घरताज्या घडामोडीCorona India Update: दिलासादायक! देशात सलग दोन दिवसांच्या रुग्णवाढीनंतर, आज नव्या रुग्णसंख्येत...

Corona India Update: दिलासादायक! देशात सलग दोन दिवसांच्या रुग्णवाढीनंतर, आज नव्या रुग्णसंख्येत ४ हजारांनी घट; २४ तासांत २५,९२० रुग्णांची नोंद

Subscribe

देशात गेल्या दोन दिवसांपासून ३० हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत होते. पण आज देशात ३० हजारांपेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. देशात कालच्या आकडेवारीच्या तुलनेत आज ४ हजारांनी रुग्णसंख्येत घट होऊन २४ तासांत २५ हजार ९२० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ४९२ रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. तर ६६ हजर २५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या देशात २ लाख ९२ हजार ९२ सक्रीय रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत १ अब्ज ७४ कोटी ६४ लाख ९९ हजार ४६१ लसीकरण पार पडले आहे.

- Advertisement -

देशात आज ४ हजार ८३७ रुग्णसंख्येत घट

देशात १५ फेब्रुवारीला २७ हजार ४०९ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर १६ फेब्रुवारीला ३ हजारांनी रुग्णवाढ होऊन ३० हजार ६१५ नव्या रुग्णांची नोंद झाली. काल, १७ फेब्रुवारीला १४२ रुग्णवाढ होऊन ३० हजार ७५७ नवे कोरोनाबाधित आढळले होते. आज ४ हजार ८३७ रुग्णसंख्येत घट होऊन २५ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. देशातील पॉझिटिव्हीटी रेट २.०७ टक्के झाला आहे.

केंद्राने राज्यांना निर्बंध शिथिल करण्याचे दिले आदेश 

दरम्यान काही दिवसांपूर्वी देशातील कोरोना रुग्णसंख्येतील चढ-उतार पाहून केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना कोरोनासंबंधीत निर्बंधांबाबत नव्याने निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. या पत्रात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी लिहिले की, ‘देशात कोरोना महामारी हळूहळू कमी होत असल्याने सर्व राज्यांमधील अतिरिक्त कोविड निर्बंधांबाबत पुर्नविचार करून सुधारणा करत निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात करू शकतात.’

- Advertisement -

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या – ४ कोटी २७ लाख ८० हजार २३५
देशातील एकूण मृत्यूची संख्या – ५ लाख १० हजार ९०५
देशातील एकूण रुग्ण बरे झालेल्यांची संख्या – ४ कोटी १९ लाख ७७ हजार २३८
देशातील एकूण सक्रीय रुग्णसंख्या – ४ लाख ९२ हजार ०९२
देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या – ७५ कोटी ६७ लाख ८७ हजार २३८
देशातील एकूण लसीकरण – १ अब्ज ७४ कोटी ६६ लाख ९९ हजार ४६१


हेही वाचा – Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 1 हजारांनी वाढले, रुग्णसंख्या मात्र स्थिर


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -