घरमहाराष्ट्रनाशिकबोलठाण  येथे शिक्षणाची भीक मागत पालकांचे चिमुकल्यांसह उपोषण

बोलठाण  येथे शिक्षणाची भीक मागत पालकांचे चिमुकल्यांसह उपोषण

Subscribe

बोलठाण उर्दू शाळेतील आंदोलन आश्वासनानंतर अखेर मागे

नांदगाव : भीक द्या… भीक द्या… शिक्षकाची भीक द्या… शिक्षण आमच अधिकार आहे…. गैरहजर शिक्षकावर कारवाई झालीच पाहिजे… या व इतर घोषणा देत येथील तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालय परिसर दणाणून सोडीत तालुक्यातील बोलठाण येथील ग्रामस्थांनी आपल्या चिमुकल्यांसह आमरण उपोषणास सुरुवात केल्याने प्रशासनाचे एकच धावपळ उडाली.

नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील बोलठाण येथील उर्दू शाळेला शिक्षक संख्येमुळे पटसंख्येवर परिणाम झाला आहे. त्यातच २५ जून २०१९ रोजी उर्दू शाळेला तांबट शाहीन अली मोहम्मद व अमीनुद्दीन चिरागुद्दीन शेख हे शिक्षक म्हणून मिळाले. मात्र त्यानंतर सदर शिक्षिका व मुख्याध्यापक मनमानी करुन आजपावेतो गैरहजर राहिल्याने व मर्जीप्रमाणे शालेय व्यवस्थापन समिती, स्थानिक पालक वर्ग व ग्रामस्थांना विश्वासात न घेता स्थापन केली. मागील २ वर्षात शाळा सुधारच्या नावावर जमा झालेली २० ते २५ हजार रुपयांची देणगी हिशोब न ठेवता वैयक्तिक कामासाठी वापरले.

- Advertisement -

तांबट या सतत गैरहजर राहिल्याने पर्यायाने विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान झाले असताना मात्र त्यांचे मुख्याध्यापक हे वेतन बील तयार करतात. त्यामुळे त्या घरी राहूनच वेतन घेत असतात. विद्यार्थ्यांना ऑनलाईन, ऑफलाईन पध्दतीने शिकविण्याचे कोणतेही प्रकारचे नियोजन न केल्याचे दिसून आले. शालेय अनुदानाचा वेळेवर विनियोग केला गेला नसल्याने अनुदान शासनाला परत गेले आदी बाबी शिक्षण समितीच्या निदर्शनास आल्याने शिक्षण समिती व ग्रामस्थांनी याबाबत वारंवार तक्रार अर्ज केले असताही कुठलीही कार्यवाही झाली नसल्याने गुरुवारी (दि. १७) अखेर मुस्लिम पंच, ग्रामस्थ यांनी आपल्या चिमुकल्यांसह पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले.

दरम्यान, गटविकास अधिकारी गणेश चौधरी व गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेवून त्यांना सदर शिक्षिकेच्या सततच्या गैरहजेरी संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नाशिक यांना पत्र देवून पत्रात संबंधित शिक्षिका तांबट शाहीन अली मोहम्मद या वारंवार दीर्घ मुदतीच्या रजेवर जातात. शालेय कामी अनधिकृत गैरहजर राहतात. त्यामुळे शालेय कामकाज नियमित नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. म्हणून त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करावी, अशी शिफारस करण्यात आली असल्याचे गटविकास अधिकारी चौधरी व गटशिक्षणाधिकारी चिंचोले यांनी सांगितल्याने सदरचे उपोषण स्थगित करण्यात आले.

- Advertisement -

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे, अमोल नावंदर, रफिक पठाण, युवासेना तालुकाप्रमुख सागर हिरे, शहरप्रमुख मुजूभाई शेख, सुनिल जाधव, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष इद्रीस सैय्यद, निसार शहा, तन्वीर सैय्यद, नंदर सैय्यद, अफजल पठाण, फिरोज पठाण, एकबाल शहा, वाहिद शहा, अय्युव सैय्यद, अरिफ शेख, रफिक पठाण, अखिल मन्यार, बिसमिल्ला मनियार, मुक्तार शेख, साजीद शेख, आदि उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अनिल शेरेकर, रवि चौधरी, शिपाइ अभिजीत उगलमुगले यांनी बंदोबस्त चोख ठेवला.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -