घरCORONA UPDATEIndia Corona Update : देशात आज कोरोनाचे 7,554 नवे रुग्ण, तर...

India Corona Update : देशात आज कोरोनाचे 7,554 नवे रुग्ण, तर मृतांची संख्या पुन्हा 200 च्या पार

Subscribe

देशातील कोरोना रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहे. देशात सध्या 6000 ते 8000 दरम्यान रुग्ण आढळून येत आहे. मात्र देशात मृतांच्या संख्येत आज पुन्हा वाढ झाल्याचे पाहायला मिळाले, गेल्या 24 तासात देशात 7,554 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आहेत. ही रुग्णसंख्या कालच्या तुलनेत जवळपास 9.2 टक्क्यांनी अधिक आहे. त्याचवेळी आज 223 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय 14,123 रुग्ण कोरोनामुक्त होत घरी परतले आहेत. यामुळे देशातील कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे.

- Advertisement -

आज नोंद झालेल्या 7,554 नव्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 42,938,599 वर पोहचली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या 85,680 झाली आहे. मात्र गेल्या 24 तासात त्यात 0.20 टक्क्यांनी घटली आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या 14,123 लोकांमुळे एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 42,338,673 झाली आहे. त्यामुळे देशातून कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 98.60 झाले आहे. तर आजच्या 223 कोरोना मृतांमुळे एकूण मृत रुग्णांची संख्या 514,246 वर पोहचली आहे.

देशातील दैनंदिन कोरोना पॉझिटिव्हीटी रेट हा 0.96 टक्के झाला आहे. तर आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट 1.06 टक्के आहे. गेल्या 24 तासात देशात 8,55,862 लसीचे डोस देण्यात आले आहे. त्याच वेळी, आतापर्यंत एकूण 1,77,79,92,977 लसीकरण करण्यात आले आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -