घरदेश-विदेशपरीक्षेत कमी गुण दिल्याने विद्यार्थ्यांनी शिक्षकांना झाडाला बांधून मारले, झारखंडमधील घटनेने खळबळ

परीक्षेत कमी गुण दिल्याने विद्यार्थ्यांनी शिक्षकांना झाडाला बांधून मारले, झारखंडमधील घटनेने खळबळ

Subscribe

दुमका – शिक्षकांनी परीक्षेत गुण दिले, त्यामुळे मनात राग ठेवून या विद्यार्थ्यांनी शिक्षकांनाच झाडाला बांधले. झारखंडमधील दुमका या गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

परीक्षेला न बसल्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कमी गुण दिले. त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांनाच झाडाला बांधून मारहाण केली. एएनआय या वृत्तसंस्थेने जारी केलेल्या फोटोमध्ये शिक्षकांना मारहाण झाल्याचं स्पष्ट दिसत आहे. शाळेचा गणवेश परिधान केलेले काही विद्यार्थी या फोटोत दिसून असून एक विद्यार्थी शिक्षकांना मारत आहे तर दुसरा विद्यार्थी हे सर्व चित्रित करत आहे.

- Advertisement -


या प्रकरणाची दखल घेत गोपी कंदरचे शिक्षण विस्तार अधिकारी, दुमका सुरेंद्र हेब्रम म्हणाले, “आम्हाला घटनेची माहिती मिळाली आणि सर्व शिक्षकांशी चर्चा केली. जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा विद्यार्थ्यांनी सांगितले की त्यांना प्रॅक्टिकलमध्ये खूप कमी गुण मिळाल्याची तक्रार आम्ही शिक्षकांकडे केली, मात्र त्यांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केलं.

जखमी शिक्षकांपैकी एक कुमार सुमन म्हणाले, “विद्यार्थ्यांनी आम्हाला बैठक घेण्याच्या बहाण्याने बोलावले आणि त्यांचा निकाल खराब झाल्याचे सांगितले. त्यांचे प्रात्यक्षिक गुण निकालात समाविष्ट न केल्यामुळे असे घडले. ते मुख्याध्यापकांनी करायचे होते. त्यामुळे आम्ही या संदर्भात कोणतेही पाऊल उचलू शकलो नाही.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -