घरताज्या घडामोडीलॉकडाऊनमध्ये Breakup झालाय तर 'हे' नक्की वाचा

लॉकडाऊनमध्ये Breakup झालाय तर ‘हे’ नक्की वाचा

Subscribe

ब्रेकअपच्या वेदना सहन करणं काही सोपं काम नसतं. जेव्हा प्रेमाचं नातं अचानक संपतं तेव्हा स्वतःला सावरणं फार कठीण होतं. विशेषतः ज्यांचा लॉकडाऊनमध्ये ब्रेकअप झाला आहे त्यांच्यासाठी हे अधिक वेदनादायक आहे. यादरम्यान घरी असल्यामुळे सतत जुन्या गोष्टी पुन्हा पुन्हा आठवत असतात.

काहीवेळी ब्रेकअपमधून बाहेर पडण्यासाठी मित्रांना भेटणं, त्यांच्यासोबत बाहेर जाणं, आवडते छंद जोपासणं, स्वतःकोणत्या कोणत्या गोष्टी व्यस्त राहावं लागतं. पण लॉकडाऊन दरम्यान हे करणं शक्य नसतं. अशा परिस्थिती ब्रेकअपमधून बाहेर पडणं फार कठीण झालं आहे. पण या परिस्थीत तुम्ही या चार पद्धतींचा अवलंब केला तर तुमच्या ब्रेकअपच्या वेदना दूर होऊ शकतात.

- Advertisement -

ऑनलाईन प्रेरणादायी चित्रपट पाहा

- Advertisement -

आपण लॉकडाऊनमध्ये बाहेर पडू शकतं नाही तर काय झालं. भूतकाळातून बाहेर पडणं शक्य आहे. यासाठी पहिल्यांदा तुम्हाला स्वतः प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. त्याकरिता तुम्ही प्रेरणादायी चित्रपटाची यादी तयार करा आणि ते ऑनलाईन पाहा. जितक्या लवकर तुम्ही जुन्या गोष्टी विसरालं तितक्या लवकर तुम्ही बेक्रअपमधून बाहेर पडालं.

मित्रांसोबत फोनवर बोला

जर मित्रांना प्रत्यक्षात भेटू शकतं नसालं तर काही हरकत नाही, त्यांच्याशी फोनवर बोला किंवा व्हिडिओ कॉलिंगवर गप्पा मारा. यामुळे तुमच्या मनावरील ओझं कमी होईल. आपलं दुःख मित्रांना सांगा पण पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सतत बोलू नका. शक्य तितकं सद्य स्थितीबद्दल आणि देश आणि जगाबद्दल बोला.

चांगली पुस्तकं वाचा

या लॉकडाऊनकडे तुम्ही संधी म्हणून पाहा. जास्तीत जास्त चांगली पुस्तकं वाचा आणि अनेक गोष्टींविषयी माहित करून घ्या. जितक्या लवकर नवीन गोष्टींमध्ये जास्त रस घ्याल तितक्या लवकर तुम्ही जुन्या आठवणीतून बाहेर पडालं. चांगली आणि प्रेरणादायक पुस्तकं वाचल्याने तुम्हाला सकारात्मक उर्जा मिळेल.

ऑनलाईन डेटिंग

ऑनलाईन डेटिंगसाठी अनेक Apps आहेत जे सर्वात विश्वासार्ह मानले जातात. जुन्या आठवणी विसरण्यासाठी या Appsवर नवीन जोडीदाराचा शोध घेतला जातो. लॉकडाऊनसाठी या डेटिंग Appsमध्ये बऱ्याच नव्या व्यवस्था देखील केल्या गेल्या आहेत, ज्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता.


हेही वाचा – यशस्वी रिलेशनशिपची सूत्रे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -