घरताज्या घडामोडीCorona update: देशात सलग तिसऱ्या दिवशी बाधितांमध्ये वाढ; दिवसभरात २,७६,७० नव्या रुग्णांची...

Corona update: देशात सलग तिसऱ्या दिवशी बाधितांमध्ये वाढ; दिवसभरात २,७६,७० नव्या रुग्णांची नोंद

Subscribe

देशात कोरोना बाधितांच्या आकड्यात चढउतार पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादु्र्भावादरम्यान, देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत असल्याने (Corona Cases in India) देशाच्या चिंतेत पुन्हा वाढ झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या तीन दिवसांत कोरोना बाधितांचा आलेख पाहता देशात मंगळवारी २ लाख ६३ हजार ५३३ कोरोना रूग्ण, बुधवारी २ लाख ६७ हजार ३३४ कोरोना रूग्ण तर गुरूवारी म्हणजेच गेल्या २४ तासात सलग तिसऱ्या दिवशी २ लाख ७६ हजार ०७० नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात २४ तासांत २ लाख ७६ हजारांहून अधिक नवे कोरोना रूग्ण आढळले असून एका दिवसात ३ हजार ८७४ जणांच्या मृत्यूची विक्रमी नोंद झाली आहे. तर ३ लाख ६९ हजार ०७७ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

- Advertisement -

दिवसभरात २,७६,०७० नवे रूग्ण आढळल्याने भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा २ कोटी ५७ लाख ७२ हजार ४०० झाला आहे. देशात २ कोटी २३ लाख ५५ हजार ४४०रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत २ लाख ८७ हजार १२२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सध्या ३१ लाख २९ हजार ८७८ इतके सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. यासह आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या १८ कोटी ७० लाख ९ हजार ७९२ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

- Advertisement -

आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, १९ मेपर्यंत देशात ३२ कोटी २३ लाख ५६ हजार १८७ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी काल दिवसभरात २० लाख ५५ हजार १० नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत.

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -