birthday boy विराटने ‘चिकू’ला लिहिलं पत्रं!

वयाची ३० वर्षं ओलांडलेल्या विराटने आज १५ वर्षीय चिकूला म्हणजेच स्वतःला पत्रं लिहिलं आहे.

virat letter.png 1

भारतीय क्रिकेटचा कर्णधार विराट कोहली आज ३१वा वाढदिवस साजरा करत आहेत. फारच कमी कालावधीत मेहनतीच्या जोरावर आज विराटने क्रिकेटमधील दिग्गजांचे रेकॉर्ड्स मोडले आहेत. विराट आज तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. जगभरातील चाहते आज त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. वयाची ३० वर्षं ओलांडलेल्या विराटने आज १५ वर्षीय चिकूला म्हणजेच स्वतःला पत्रं लिहिलं आहे.

पत्राद्वारे चिकूला लिहिला जीवनाचा संदेश

या पत्राद्वारे विराटने १५ वर्षीय चिकूची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. पत्राच्या पहिल्या वाक्यातच विराटने चिकूला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तुझ्याकडे माझ्यासाठी तुझ्या भविष्याबाबत अनेक प्रश्न आहेत याची कल्पना आहे. पण त्या सर्वच प्रश्नांची उत्तरे मी देणार नाही. यासाठी मला माफ कर असे लिहून विराटने चिकूसाठी लिहिलेल्या पत्राची सुरुवात केली आहे. भविष्याबाबत काही माहीत नसताना अनपेक्षित मिळणारे सप्राईज गोड वाटतात. आयुष्याच्या वाटेतील प्रत्येक आव्हान थरारक वाटतं तर प्रत्येक निराशा त्यातून शिकण्याची एक संधी निर्माण करते. तुला हे आज कळणार नाही. पण, कोणा एका ठिकाणी पोहोचण्यापेक्षा त्या ठिकाणी पोहोचण्यासाठीचा प्रवासच अधित महत्त्वाचा असतो…. आणि प्रवास असतोच मुळात सर्वोत्तम. असे विराटने चिकूला लिहिलेल्या पत्राच्या पहिल्या उताऱ्यात म्हटले आहे.

पुन्हा पुन्हा प्रयत्न कर

विराट चिकूला पुढे लिहितो की, ‘मी तुला सांगू इच्छितो की, जीवनात तुझ्यासाठी खूप गोष्टी वाढून ठेवल्या आहेत. पण त्यासाठी आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संधीसाठी तू सज्ज असणं अपेक्षित आहे. मिळालेल्या संधीचं सोनं कर, महत्वाचे म्हणजे तुझ्याकडे असणाऱ्या कोणत्याच गोष्टीला गृहीत धरू नकोस. प्रत्येकाप्रमाणे तुलाही अपयशाचा सामना करावा लागेल. पण तू मला वचन दे की, पुन्हा नव्या जोमानं उभं राहण्यास तू विसरणार नाहीस. पहिल्याच प्रयत्नात अपयशी ठरलास तरी पुन्हा त्यासाठी प्रयत्न कर. आयुष्याच्या प्रवासात तुला अनेकांचं प्रेम मिळेल. तर काहीजणांना तू आवडणार देखील नाही. किंबहुना ते तुला ओळखतसुद्धा नसतील. पण तू त्यांची पर्वा करु नकोस. स्वतःवर विश्वास ठेव.

virat letter.png 1

पत्राच्या अखेरीस बाबांची आठवण

मला माहीत आहे आज तुला बाबांनी न घेतलेल्या शूजचा विचार करत आहेस. पण बाबांनी तुला मारलेली मिठी, किंवा तुझ्या उंचीवरुन केलेला एखादा विनोद आठव. यासर्वांची तुलना बाबांनी तुला न घेतलेल्या शूजशी होऊच शकत नाही. हे क्षण तू जप. मला माहीत आहे बाबा कधीकधी तुझ्याशी खूपच शिस्तप्रिय वागतात. पण, तुला एक चांगली व्यक्ती करण्यासाठीच ते असं करत आहेत. लक आपल्याला कधीकधी समजून घेत नाहीत असं तुला वाटत असेल. पण हे लक्षात ठेव की, कुटुंबाकडूनच तुम्हाला निःस्वार्थ प्रेम मिळतं. याबदल्यात तू सुद्धा त्यांना भरपूर प्रेम दे, त्यांचा आदर कर, त्यांच्यासोबत वेळ व्यतीत कर. बाबांना सांग की तुझं त्यांच्यावर किती प्रेम आहे. आज ते प्रेम व्यक्त कर, उद्याही व्यक्त कर…. हे प्रेम संधी मिळेल तेव्हा व्यक्त करत राहा.’

virat letter

स्वप्नांचा पाठलाग सोडू नकोस

पत्राच्या सुरुवातीप्रमाणेच शेवटसुद्धा विराटने चिकूला मोलाचे मार्गदर्शन केले आहे. यामध्ये विराट लिहितो की, “मोठी स्वप्नं पहा. त्या स्वप्नांचा पाठलाग कर. प्रेमपूर्वक वाग. आणि जगाला दाखवून दे की, मोठी स्वप्न पाहणं कशा प्रकारे मोठे बदलही घडवून आणतं. सर्वात शेवटी विराटने आईच्या हातल्या पराठ्याचेही मनापासून आभार मानले. अतिसय खुल्या मनाने लिहिलेल्या या पत्रातून विराट अगदी खुल्या मनाने सर्वांसमोर आला आहे.

हेही वाचा – birthday boy विराट कोहली सहपत्नीक करतोय ‘या’ गावाची सफर!