घरदेश-विदेशभारतीय औषध कंपनीच्या आय ड्रॉपमुळे अमेरिकेत खळबळ; 3 मृत्यू, तर 8 जणांना...

भारतीय औषध कंपनीच्या आय ड्रॉपमुळे अमेरिकेत खळबळ; 3 मृत्यू, तर 8 जणांना अंधत्व

Subscribe

नवी दिल्ली : एका भारतीय औषध कंपनीच्या आय ड्रॉपने अमेरिकेत खळबळ उडवली आहे. या आय ड्रॉपच्या वापरामुळे अमेरिकेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील सर्वोच्च वैद्यकीय देखरेख करणार्‍या संस्थेने या औषधामध्ये प्रतिरोधक बॅक्टेरिया असण्याच्या शक्यतेवर चिंता व्यक्त केली आहे. न्यूयॉर्क टाईम्स या वृत्तसंस्थेने ही माहिती सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या हवाल्याने दिली आहे. अहवालानुसार, या आय ड्रॉपच्या वापरामुळे आतापर्यंत आठ जणांना अंधत्व आणि डझनभर लोकांना संसर्ग झाला आहे.

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) चा हवाला देऊन न्यूयॉर्क टाइम्सने सांगितले की, या औषधाचा डोळ्यांसाठी वापर केल्यानंतर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अंधत्वाची आठ प्रकरणे आणि डझनभर संसर्ग झाल्याची माहिती समोर येत आहे. हे औषध चेन्नईस्थित ग्लोबल फार्मा हेल्थकेअरने अझरिकेअर आर्टिफिशियल टियर्स या ब्रँड नावाने तयार केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – गोहत्या बंदी कायद्याचा होतोय दुरुपयोग; वाचा काय आहे प्रकरण

भारतातून आयात केलेल्या आय ड्रॉप्समध्ये आढळणारे प्रतिरोधक बॅक्टेरिया अमेरिकेत पाय रोवू शकतात याची सीडीसीला चिंता आहे. संसर्गजन्य रोग तज्ज्ञांनी सांगितले की, हा प्रकार अमेरिकेत यापूर्वी आढळला नव्हता. अशा परिस्थितीत अमेरिकेतील सध्याच्या अँटिबायोटिक्सने त्यावर उपचार करणे फार कठीण आहे.

- Advertisement -

चेन्नईच्या दक्षिणेस 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्लोबल फार्मा हेल्थकेअरने फेब्रुवारीमध्ये अमेरिकन बाजाराशी संबंधित आय ड्रॉप्सचे उत्पादन थांबवले होते. तसेच ग्राहक स्तरावर अझरिकेअर कृत्रिम अश्रू आणि डेल्सम फार्माचे सर्व उर्वरित औषध स्वेच्छेने परत मागवले होते.

गेल्या वर्षी गांबिया आणि उझबेकिस्तानमध्ये कफ सिरपमुळे डझनभर मुलांचा मृत्यू झाल्यानंतर भारतीय डोळ्यांच्या औषधाची ही नवीन घटना आता समोर आली आहे. यामुळे अमेरिकेपासून भारतापर्यंत खळबळ उडाली आहे. यूएस फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनने असे म्हटले आहे कीस अझ्रिकेअर आर्टिफिशियल टीअर्सच्या वापरामुळे डोळ्यांच्या संसर्गाचा धोका वाढत असून यामुळे अंधत्व किंवा मृत्यू होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -