घरदेश-विदेशशिक्षेविरोधात दाखल केलेल्या याचिकेतून राहुल गांधींची मोदींवर पुन्हा टीका

शिक्षेविरोधात दाखल केलेल्या याचिकेतून राहुल गांधींची मोदींवर पुन्हा टीका

Subscribe

मोदी या आडनावावरून बदनामीकारक वक्तव्य केल्यानंतर या प्रकरणी फक्त नरेंद्र मोदीच तक्रार दाखल करू शकतात, इतर कोणताही मोदी नाही, असे राहुल गांधी यांनी दाखल केलेल्या याचिकेत लिहिण्यात आले आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी मोदी आडनावावरून बदनामीकारक वक्तव्य केल्याने त्यांना सुरतच्या जिल्हा सत्र न्यायालयाकडून शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर या प्रकरणी लोकसभा सचिवालयाकडून कारवाई करत राहुल गांधी यांचे खासदारकी पद देखील रद्द करण्यात आले. पण शिक्षेविरोधात राहुल गांधी यांच्याकडून सुद्धा याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच मोदी या आडनावावरून बदनामीकारक वक्तव्य केल्यानंतर या प्रकरणी फक्त नरेंद्र मोदीच (PM Narendra Modi) तक्रार दाखल करू शकतात, इतर कोणताही मोदी नाही, असे राहुल गांधी यांनी दाखल केलेल्या याचिकेत लिहिण्यात आले आहे.

काय लिहिले आहे याचिकेत?
तक्रारदार पूर्णेश मोदी हे भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 499 च्या उद्देशाने पीडित व्यक्ती नव्हते, जे बदनामीचा गुन्हा ठरवते आणि त्यामुळे त्यांना तक्रार दाखल करण्याचा अधिकार नव्हता. सामान्यपणे, फौजदारी कायदा कोणीही चालवू शकतो, परंतु जोपर्यंत कलम 499 आणि 500 ​​अंतर्गत मानहानीच्या गुन्ह्याचा संबंध आहे, अशा प्रकरणात फक्त पीडित व्यक्तीच तक्रार दाखल करू शकते.

- Advertisement -

तर “नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध वैयक्तिकरित्या आरोप केल्याबद्दल, केवळ नरेंद्र मोदींनाच मानहानीच्या गुन्ह्यासाठी पीडित व्यक्ती म्हणून ग्राह्य धरले जाऊ शकते आणि फक्त नरेंद्र मोदीच तक्रार दाखल करू शकतात. पण पूर्णेश मोदी हे प्रतिवादी/तक्रारदार आहेत. त्यांच्या वतीने इतर कोणत्याही मोदीने या प्रकरणात तक्रार दाखल करण्याचा संबंध येत नाही”, असे राहुल गांधी यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.

कोणत्या प्रकरणात राहुल गांधींना झाली आहे शिक्षा?
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी हे कर्नाटकातील कोलारमध्ये म्हणाले होते की, “सर्व चोरांची आडनावे मोदी कशी आहेत?” राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर सुरत पश्चिमेतील भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल गांधींनी मोदी समाजाचा अपमान केल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. यानंतर हे प्रकरण सुरतच्या न्यायालयात पोहोचले. या प्रकरणात राहुल गांधी यांना याआधी 9 जुलै 2020 रोजी सुरत न्यायालयात हजर राहावे लागले होते. तर गेल्या महिन्यात पूर्णेश मोदी यांनी या प्रकरणी लवकर निर्णय घेण्यासाठी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

- Advertisement -

हेही वाचा – गेल्या आठवड्यात मंत्रालयासमोर विषप्राशन करणाऱ्या दुसऱ्या महिलेचाही मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -