घरदेश-विदेशभारतीय वंशाचे थर्मन षणमुगारत्नम सिंगापूरचे नवे राष्ट्रपती; याआधी होते उपपंतप्रधान

भारतीय वंशाचे थर्मन षणमुगारत्नम सिंगापूरचे नवे राष्ट्रपती; याआधी होते उपपंतप्रधान

Subscribe

सिंगापूरनंतर पुढील वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीतही भारतीय वंशाचे उद्योजक निवडणूक लढणार असणार असल्याचे वृत्त आहे

सिंगापूर : भारतीय वंशाचे असलेले मात्र सिंगापूरमध्ये जन्मलेले अर्थतज्ज्ञ थर्मन षणमुगारत्नम यांनी शुक्रवारी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. आता ते सिंगापूरचे नवे राष्ट्रपती असणार आहेत. थर्मन षणमुगारत्नम यांनी सिंगापूरच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्याने, ते जगातील महत्त्वाच्या देशात वर्चस्व गाजवणाऱ्या भारतीय वंशाच्या नेत्यांच्या यादीत त्यांना स्थान मिळाले आहे. त्यांचा हा विजय जगभरातील भारतीयांच्या वाढत्या प्रभावाचे प्रतिक मानला जातो.(Indian-origin Tharman Shanmugaratnam, Singapore’s new president; Earlier he was the Deputy Prime Minister)

सिंगापूरनंतर पुढील वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीतही भारतीय वंशाचे उद्योजक निवडणूक लढणार असणार असल्याचे वृत्त आहे. ही निवडणूक पुढील वर्षी असली तरी याकडेही सर्व जगाचे लक्ष लागले आहे. दरम्यान त्याआधीच आता शुक्रवारी सिंगापूरमध्ये झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे असेलेल थर्मन षणमुगारत्नम यांनी विजय मिळवल्याने सर्वस्तरातून त्यांचे कौतूक केले जात आहे.

- Advertisement -

चीनी वंशाच्या प्रतिस्पर्ध्यांचा केला पराभव

2011 ते 2019 या काळात सिंगापूरचे उपपंतप्रधान राहिलेल्या षणमुगरत्नम (66) यांना 70.4 टक्के मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी एन. कोक सॉंग आणि टॅन किन लियान यांना अनुक्रमे 15.7 टक्के आणि 13.8 टक्के मते मिळाली. 2011 नंतर प्रथमच झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत थर्मन षणमुगररत्नम यांनी चिनी वंशाच्या दोन प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली.

पंतप्रधानांनी केले थर्मन यांचे अभिनंदन

पंतप्रधान ली सिएन लूंग यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्याबद्दल षणमुगरत्नम यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, सिंगापूरवासीयांनी निर्णायक फरकाने थर्मन षण्मुगररत्नम यांना आमचे पुढचे अध्यक्ष म्हणून निवडले आहे. आता निवडणूक संपली आहे, आपण सिंगापूरकर म्हणून पुन्हा एकदा एकत्र येऊ या आणि पुढच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि एक मजबूत आणि एकसंध राष्ट्र निर्माण करूया असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisement -

कमला हॅरिस वाढवतायेत अमेरिकेत भारताच मान

कमला हॅरिसच्या यांच्या यशानंतर अमेरिकेतील भारतीय-अमेरिकन समुदायाचा वाढता प्रभाव दिसून येतो. कमला हॅरिस या देशातील पहिल्या महिला आणि पहिल्या कृष्णवर्णीय अमेरिकन उपराष्ट्रपती झाल्या. त्यांनी 2017 ते 2021 पर्यंत कॅलिफोर्नियाच्या सिनेटर पदावर काम केले. हॅरिस यांनी 2011 ते 2017 पर्यंत कॅलिफोर्नियाचे ऍटर्नी जनरल म्हणूनही काम केले. त्यांचा जन्म कॅलिफोर्नियामध्ये भारतीय आणि जमैकन कुटुंबामध्ये झाला.

हेही वाचा : आता एअर इंडिया आणखी जोमाने घेणार भरारी; विस्ताराचेही मिळणार बळ, CCI कडून हिरवा कंदील

भारतीय वंशाचे पाच खासदार अमेरिकेच्या सभागृहात

नोव्हेंबर महिन्यात झालेल्या महत्त्वपूर्ण मध्यावधी निवडणुकांमध्ये, सत्ताधारी डेमोक्रॅट पक्षाचे पाच भारतीय-अमेरिकन खासदार- राजा कृष्णमूर्ती, रो खन्ना, प्रमिला जयपाल, अमी बेरा आणि ठाणेदार – अमेरिकन प्रतिनिधीगृहात निवडून आले आहेत.

हेही वाचा : राजस्थानमध्ये मणिपूरची पुनरावृत्ती; गर्भवती महिलेला पतीने निर्वस्त्र करून फिरवलं गावभर

इंग्लंडनंतर आता अमेरिकेकडे लक्ष

ऋषी सुनक हे ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान आहेत. कॅलिफोर्नियातील प्रख्यात राजकारणी हरमीत ढिल्लन यांनी अलीकडेच रिपब्लिकन नॅशनल कमिटी (RNC) च्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली. निक्की हेली आणि विवेक रामास्वामी सारख्या भारतीय वंशाच्या नेत्यांनी 2024 मध्ये अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तयार सुरू केले आहे.

हेही वाचा :INDIA alliance : सर्व धागे जुळून एक अतूट वस्त्र निर्माण होत आहे, मात्र…, ठाकरे गटाचा इशारा

ब्रिटनेच पहिले हिंदू पंतप्रधान ऋषी सुनक

ऋषी सुनक हे गेल्या वर्षी ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान बनले. सुनक हे 210 वर्षातील सर्वात तरुण ब्रिटनचे पंतप्रधान आहेत. ते ब्रिटनचे पहिले हिंदू पंतप्रधान देखील आहेत. मूळच्या गोव्यातील सुएला ब्रेव्हरमन या त्यांच्या गृहसचिव म्हणून कार्यरत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -