Eco friendly bappa Competition
घर क्राइम राजस्थानमध्ये मणिपूरची पुनरावृत्ती; गर्भवती महिलेला पतीने निर्वस्त्र करून फिरवलं गावभर

राजस्थानमध्ये मणिपूरची पुनरावृत्ती; गर्भवती महिलेला पतीने निर्वस्त्र करून फिरवलं गावभर

Subscribe

राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यात पुन्हा एकदा मणिपूर घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. पतीने आपल्या गर्भवती पत्नीला निर्वस्त्र करत तिला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 31 ऑगस्ट रोजी प्रतापगड जिल्ह्यातील धारियावाड पोलीस ठाण्याच्या परिसरात ही घटना घडली.

राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यात पुन्हा एकदा मणिपूर घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. पतीने आपल्या गर्भवती पत्नीला निर्वस्त्र करत तिला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 31 ऑगस्ट रोजी प्रतापगड जिल्ह्यातील धारियावाड पोलीस ठाण्याच्या परिसरात ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आठ आरोपींची ओळख पटवली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिवाय, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून पोलिसांना कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (rajasthan pratapgarh husband stripped his wife and paraded her in village relatives making video

मिळालेल्या माहितीनुसार, 31 ऑगस्ट रोजी एका महिलेला तिच्या पतीने विवस्त्र करून संपूर्ण गावात फिरवले. महिलेला विवस्त्र केल्याचा व्हिडिओही समोर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये महिला रडताना दिसत आहे. महिलेला तिचा पती आणि कुटुंबीयांनी विवस्त्र करून मारहाण केल्याचे समोर आले आहे. गरोदर महिलेला विवस्त्र करून गावभर फिरण्यात आल्याचा धक्कादायक समोर आल्यानंतर राजस्थानमध्ये खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

प्रतापगड जिल्ह्यातील धारियावाड शहरातील पहाडा गावातील ही घटना आहे. या घटनेतील पीडित महिलेचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते. तिचे जवळच्या गावात राहणाऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. चार दिवसांपूर्वी ती तिच्या प्रियकरासह पळून गेली होती. ही बाब घरच्यांना कळताच त्यांनी महिलेचा पाठलाग करून तिला पकडले. ही महिला गर्भवती होती. या गर्भवती महिलेला गावात आणले आणि तिच्या पतीने विवस्त्र केले. यामध्ये महिलेचे आई-वडील आणि इतर कुटुंबीयांचाही सहभाग होता. त्यानंतर महिलेला विवस्त्र करून बेदम मारहाण करून गावात फिरत असल्याचा व्हिडीओ शुक्रवारी संध्याकाळी सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला आहे.

दरम्यान, 31 ऑगस्ट रोजी या महिलेच्या सासरच्यांनी तिला आणि तिच्या प्रियकराला पकडले. त्यानंतर पतीने महिलेला गावकऱ्यांसमोर नग्न केले.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आदेश

“प्रतापगड जिल्ह्यात पेहार आणि सासरच्या लोकांमधील कौटुंबिक वादामुळे एका महिलेला तिच्या सासरच्या लोकांनी विवस्त्र केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. पोलीस महासंचालकांना घटनास्थळी पाठवून याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सुसंस्कृत समाजात अशा गुन्हेगारांना स्थान नाही. या गुन्हेगारांना लवकरात लवकर तुरुंगात टाकले जाईल आणि फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला जाईल,” असे ट्वीट मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले आहे.


हेही वाचा – जालन्यातील घटनेवरून उद्धव ठाकरेंनी साधला सरकारवर निशाणा, म्हणाले – “एक फुल, दोन हाफ…”

- Advertisment -