घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रजालन्यातील घटनेचे तीव्र पडसाद; काय म्हणताय नाशिक मधील मराठा संघटना ?

जालन्यातील घटनेचे तीव्र पडसाद; काय म्हणताय नाशिक मधील मराठा संघटना ?

Subscribe

नाशिक : जालन्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर तुफान लाठीमार केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटले. नाशिकमध्येही मराठा संघटनांने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलकांना हुसकावले. त्यामुळे वाद आणखी पेटला. याविरोधात नाशिकमधील मराठा संघटनांनी तीव्र निषेध नोंदवला असून, जालना पोलीस अधीक्षकांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत नाशिक मधील मराठा संघटनांनी  ‘माय महानगर’कडे आपल्या भावना व्यक्त केल्या.

मराठा समाज शांततेत आंदोलन करत असताना पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून लाठीचार्ज व हवेत गोळीबार करत आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. याचा आम्ही जाहीर निषेध करतो. मुख्यमंत्री शिंदे व गृहमंत्री फडवणीस यांना विनंती आहे की जालना जिल्ह्याच्या एसपींना तात्काळ निलंबित करा व जनभावना समजून मराठा आरक्षणाचा निर्णय घ्या. अन्यथा, सरकारचा निषेध करत जनआंदोलन उभारू. : करण गायकर, राज्य संपर्कप्रमुख, स्वराज्य पक्ष

- Advertisement -

 

जालना येथील घटना अत्यंत निंदनीय आहे. या घटनेच्या निषेधार्थ छत्रपती सेना आंदोलन छेडणार आहे. महिनाभरापासून उपोषण सुरू असतानाही मंत्रीमंडळातील एकाही मंत्र्याने शिष्टाई करू नये, हे सरकारचे अपयश आहे. सत्तेवर येण्यापूर्वी भाजप सरकारने जे आश्वासन समाजाला दिले होते ते पूर्ण करावे. मात्र, दुर्देवाने सरकार मराठा आरक्षण प्रश्नी कोणतेही ठोस पावले उचलताना दिसत नाही. : चेतन शेलार, संस्थापक अध्यक्ष, छत्रपती सेना

- Advertisement -

 

राज्यात आज ज्यांची सत्ता आहे ते मराठ्यांविरोधात का वागतात, याकडे लक्ष्य वेधण्याची गरज आहे. कारण, अन्य समाजाची निदर्शने पाहिल्यास तर त्यांच्यावर लाठीचार्ज कधी झाला नाही. मग मराठा समाजाच्या आंदोलकांवरच का लाठीचार्ज होतो. आम्ही हा मुद्दा मांडायचाच नाही का? ज्या अधिकार्‍यांनी लाठीचार्जचे आदेश दिले त्यांना निलंबित केले नाही तर संपूर्ण राज्यभर मोठा उद्रेक होईल. : नीलेश मोरे, जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ

 

आरक्षणाचा मुद्दा अनेक वर्षांपासून कायम आहे. प्रत्येक सरकार सत्तेत येण्यापूर्वी आश्वासनांचे गाजर दाखवते. जगाला हेवा वाटावा असे ५६ क्रांतीमोर्चे झाले. कुठेही गालबोट लागले नाही. आम्ही आमच्या मागण्या रितसर पद्धतीने मांडत आहोत. सरकार वेळकाढू धोरण स्विकारते. मात्र, प्रत्येकवेळी चालढकल केली जाते. जालन्यातील प्रकार क्लेशदायक आहे. महिलांवरसुद्धा लाठीचार्ज केला. एकीकडे महिला सन्मानाच्या गोष्टी करता अन् दुसरीकडे महिलांवर लाठीचार्ज केले जाते. या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आहोत. : माधुरी भदाणे, प्रदेशाध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड

 

मराठा आरक्षणाच्या मागणीची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी. शिंदे सरकारच्या काळात समाजाला निश्चितपणे न्याय मिळेल. झालेल्या घटनेचा निषेधच आहे. परंतु, शिंदे सरकार निश्चितपणे यात लक्ष घालून हा प्रश्न कायमस्वरुपी सोडवेल, यात शंका नाही. : अस्मिता देशमाने, मराठा क्रांती मोर्चा, महिला आघाडी 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -