घरताज्या घडामोडीअफगाणिस्तानात अडकलेले भारतीय मायदेशी परतणार, भारताला काबूलमध्ये दररोज दोन विमान उड्डाणांना परवानगी

अफगाणिस्तानात अडकलेले भारतीय मायदेशी परतणार, भारताला काबूलमध्ये दररोज दोन विमान उड्डाणांना परवानगी

Subscribe

अफगाणिस्तामध्ये अडकलेल्या ८७ भारतीय नागरिकांना एअर इंडियाच्या विमानाने भारतात आणण्यात आले. रविवारी पहाटे हे विमान दिल्लीत दाखल झाले.

तालिबान्यांनी ( Taliban) अफगाणिस्तानवर (Afganistan) ताबा मिळवल्यापासून तिथे अडकलेले भारतीय मायदेशी परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. रविवारी अफगाणिस्तामध्ये अडकलेल्या ८७ भारतीय नागरिकांना एअर इंडियाच्या विमानाने भारतात आणले गेले. अफगाणिस्तानमध्ये अडकलेले भारतीय काबूल विमानतळावर जमा होत असून आता त्यांनी परत मायदेशी आणण्यासाठी दररोज दोन विमानांच्या उड्डाणांना अमेरिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. काबूल विमानतळावर सध्या अमेरिकेचे सैन्य तैनात आहे. त्याच्यामार्फत अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या नागरिकांना पुन्हा भारतात आणले जात आहे. काबूल विमानतळावर सध्या ५ हजार अमेरिकन आणि नाटो सैन्य आहे. (Indians stranded in Afghanistan will return home, allowing India two daily flights to Kabul)

- Advertisement -

अफगाणिस्तानमधून सुखरुपपणे भारतात आलेल्या भारतीय विमानात बसताच त्यांनी ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या. त्यासंबंधीचा एक व्हिडिओ एएनआय कडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. अफगाणिस्तामध्ये अडकलेल्या ८७ भारतीय नागरिकांना एअर इंडियाच्या विमानाने भारतात आणण्यात आले. रविवारी पहाटे हे विमान दिल्लीत दाखल झाले.

- Advertisement -

सध्या काबूल विमानतळावर अमेरिकी सुरक्षा यंत्रणा तैनात आहे त्याचप्रमाणे नाटो सैन्याकडून सध्या काबूल विमानतळावर २५ विमानांची उड्डाणे चालवली जात आहे. याआधी देखील भारतीय हवाई दलाने १८० भारतीयांना सुखरुप भारतात आणले. यामध्ये भारतीय नागरिक,पत्रकार,मुत्सद्दी आणि दूतावासातील कर्मचारी त्याचप्रमाणे भारतीय सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

 


हेही वाचा – १० वर्षांपासून नागपूरमध्ये राहणार अफगाणी नागरिक झाला तालिबानी, फोटो झाला व्हायरल

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -